आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घटना:चंद्रपूर जिल्ह्यातील लाडबोरी परिसरात अवकाशातून पडली धातूची रिंग

चंद्रपूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील सिंदेवाही तहसील अंतर्गत लाडबोरी गावाच्या परिसरात धातूची एक गोलाकार रिंग आकाशातून पडली. ही बातमी हवेसारखी पसरली. त्यामुळे या रिंगजवळ लोकांनी गर्दी केली होती. पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. प्रत्यक्षदर्शीनुसार, आगीच्या ज्वाळेप्रमाणे कसली तरी वस्तू जोरदारपणे खाली कोसळली. हे सॅटेलाइटचे तुकडे असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र अजूनही नेमके काय हे स्पष्ट झाले नाही.

दुसरीकडे गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातही आगीच्या ज्वाळेप्रमाणे वस्तू जोरदारपणे खाली कोसळल्याची चर्चा सुरू आहे. परंतु याची अधिकृत माहिती मिळाली नाही. कुणी याला अंतराळ यानाचे तुकडे तर कुणी रॉकेटचा बूस्टर म्हणून सांगत आहेत. खगोलशास्त्राचे चंद्रपूर येथील तज्ज्ञ सुरेश चोपणे यांनी हा उल्कापात नसून, हे अंतराळ यानाचे किंवा रॉकेटचे तुकडे असावेत, असे म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...