आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • A Petition Was Filed In The Bombay High Court To Declare Ludo As A Game Of Luck, Not Skill, The Petitioner Said People Are Gambling; News And Live Updates

लूडोविरोधात हायकोर्टात याचिका:कौशल्य नव्हे तर नशिबाचा खेळ म्हणून जाहीर करा - याचिकाकर्ता; कोर्टाने राज्य सरकारला जाब विचारला

मुंबई16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लुडोच्या नावावर जुगार खेळला जात आहे - याचिकाकर्ता

ऑनलाईन माध्यमातून खेळला जाणाऱ्या 'लूडो' या खेळाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत लूडो हा कौशल्याचा खेळ नसून नशिबाचा खेळ म्हणून जाहीर करावे अशी मागणी करण्यात आली आहे. ही याचिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी केशव मुळेने वकील निखिल मेंगडे यांच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

लूडोला ऑनलाईन माध्यमातून खेळत असून यामध्ये लोक मोठ्या प्रमाणावर पैशाची पैज लावत असल्याचे याचिकेत दावा करण्यात आला आहे. जो जुगार कायद्याच्या कलम 3, 4 आणि 5 अंतर्गत येतो. त्यामुळे संबंधित अॅपवर कारवाई करण्याची मागणीही यामध्ये करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने संबंधित प्रकरणात राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. त्यामुळे पुढील सुनावणी 22 जून 2021 रोजी होणार आहे.

याचिकाकर्ता केशव मुळेने संबंधित प्रकरणात पहिली याचिका प्रथम दंडाधिकारी न्यायालयात दाखल केली होती. ज्यामध्ये न्यायालयाने लूडोला कौशल्याचा खेळ मानत एफआयआर नोंदवण्यास नकार दिला होता. न्यायालयाचे म्हणणे होते की, जेव्हा चार लोक 5 रुपयांच्या पैजांसह लुडो खेळतात तेव्हा विजेत्यास 17 रुपये आणि अ‍ॅप चालविणार्‍याला 3 रुपये मिळत असल्याचे सांगितले होते.

लुडोच्या नावावर जुगार खेळला जात आहे - याचिकाकर्ता
हॉलिडे न्यायालयाचे न्यायमूर्ती एस एस शिंदे आणि न्यायमूर्ती अभय आहुजा यांनी संबंधित याचिकेवर गुरुवारी सुनावणी केली. सुनावणीदरम्यान, त्यांनी संबंधित याचिकेवर विचारमंथन केल्यावर यावर तातडीने सुनावणी घेण्याची काय गरज आहे असे सांगितले. यावर याचिकाकर्त्याचे वकील निखिल मेंगडे म्हणाले की, लुडोच्या नावाने जुगार हा समाजात वाईट रूप घेत असून तरूणवर्ग त्याकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहे. त्यामुळे यावर तात्काळ सुनावणी घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस जारी केली
याचिकेनुसार, लूडो हा खेळ डायस (फासा) प्रकारात मोडतो. फासे टाकल्यानंतर त्यामध्ये गुण किती मिळतात यावर हा खेळ अवलंबून आहे. त्यामुळे हा कौशल्याचा खेळ नसून नशिबाचा खेळ आहे. यामध्ये खेळणारे लोक मोठ्या प्रमाणावर पैशाची पैज लावतात तेंव्हा हा खेळ जुगाराचे रुप धारण करतो. उच्च न्यायालयाने राज्य सरकारला यासंदर्भात नोटीस बजावली असून यावरील पुढील सुनावणी 22 जूनला होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...