आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्धा:खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगवास भोगत असलेल्या कैद्याची जिल्हा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या

वर्धाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल झाला असता,त्याला जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले होते. 6 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास आरोपीने टॉवेल बांधून गळफास घेतला असल्याची घटना उघडकीस आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक गोपीचंद रामचंद्र डहाके (वय 38 रा. उमरखेड) जिल्हा यवतमाळ या आरोपीने हत्या केली असल्याने, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा सिद्ध झाल्यानंतर न्यायालयाने त्याला शिक्षा सुनावली होती.आरोपीला अमरावती येथील कारागृहात ठेवण्यात आले होते. नंतर त्याची रवानगी वर्धा जिल्हा कारागृहात करण्यात आली होती. आरोपीने सुट्टीचा अर्ज दाखल केला असता, त्याला पेरोल सोडण्यात आले होते. पेरोल समाप्त होऊनही आरोपी हा परत आला नसल्यामुळे वर्धा, यवतमाळ व अमरावती पोलिस त्याच्या मार्गावर होते. आरोपी हा मूळ गावी असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्याला ताब्यात घेत वर्धा जिल्हा कारागृहात पाठवण्यात आले. 6 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास कारागृहातील खोलीमध्ये असलेल्या खिडकीला टॉवेल बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना उघडकीस आली. यामुळे आरोपींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. कैद्याच्या आत्महत्ये प्रकरणी न्यायालयाने चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. कैद्याचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता नागपूर येथे पाठविण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...