आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागहू आणि भात शेताच्या मध्यभागी शिल्लक राहिलेले खोड नष्ट करण्यासाठी देश-विदेशात संशोधन केले जात आहे, जेणेकरून ते जाळल्याने वाढणारे प्रदूषण कमी करता येऊ शकेल. फिरोजपूरच्या जीरा येथील शहीद गुरुराम दास सरकारी मुलींच्या उच्च माध्यमिक स्मार्ट स्कूलची विद्यार्थिनी भजनप्रीत कौरनेदेखील एक शोध लावला आहे. यासाठी राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत तिला पुरस्कारही मिळाला आहे. नुकत्याच झालेल्या या राष्ट्रीय स्पर्धेत पंजाबच्या ८ विद्यार्थिनींनी सहभाग घेऊन आपले प्रयोग सादर केले होते. त्यात भजनप्रीतच्या प्रकल्पाची निवड २३ त २५ नोव्हेंबरदरम्यान गोव्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे.
शेतातील खोडांचे खतामध्ये रूपांतर करण्याचा फॉर्म्युला
भजनप्रीत कौरने सांगितले की, आम्ही गुळ, शेण, कुजलेली झाडे आणि यीस्टचे मिश्रण तयार केले. नंतर त्याची शेतातील खोडांवर फवारणी केली. यामुळे २८ दिवसांत खोड सडून जमिनीशी एकरूप होईल. हे खोड नष्ट होण्यासोबतच जमिनीची सुपिकता सुमारे २३ टक्के वाढेल. याचा परिणाम पुढच्या पिकावरही दिसून येईल. यासोबतच या मिश्रणासाठी (लिक्विड) एकरी केवळ ५०० रुपये खर्च येतो. प्राथमिक संशोधनाद्वारे तयार केलेल्या मिश्रणाद्वारे खोड नष्ट करण्यात ४२ दिवस लागत होते. आम्ही पुन्हा संशोधन केले आणि हा कालावधी २८ दिवसांवर आणला.
२५ विद्यार्थ्यांत भजनप्रीत
भजनप्रीतचा प्रोजेक्ट राज्यस्तर, उत्तर विभागात अव्वल ठरला. १७८ स्पर्धकांत अंतरराष्ट्रीयस्तरावर निवडलेल्या २५ विद्यार्थ्यांमध्ये भजनप्रीतचा समावेश आहे.
प्रदूषण कमी करणे हा उद्देश
भजनप्रीत कौर म्हणाली, या संशोधनाचा उद्देश देशभरातील शेतांत खोड जाळल्याने वाढणारे प्रदूषण व ते जाळल्याने कमी होणारी सुपिकता वाचवणे आहे.
आयएएस होण्याचे स्वप्न
भजनप्रीतचे स्वप्न आयएएस बनण्याचे आहे. ती देशसेवा करू इच्छिते. ती म्हणाली- समाजहितार्थ अशी संशोधने यापुढेही करत राहील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.