आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मुंबईत भीषण अपघात:वेगवान कार अनियंत्रित होऊन कॅफेत घुसली, चौघांचा जागीच मृत्यू तर 8 जण गंभीर जखमी

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये सोमवारी रात्री उशीरा एक वेगवान कार अनियंत्रित होऊन कॅफेमध्ये घुसली. यात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 3 महिला आणि एका पुरुषाच समावेश आहे. तसेच, या अपघातात 8 जण जखमी झाले आहेत.

कैफेबाहेर दुकान लावणाऱ्या चौघांचा मृत्यू

कार चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, कार सदानंद हॉटेलकडून वेगाने येत होती, यावेळी हॉटेलबाहेर दुकान लावणाऱ्या चौघांना चिरडत कार 'कैफे जनता रेस्टोरेंट'मध्ये धुसली. या अपघातात सरोजा नायडू (65), जुबेदा अब्दुल खान (60), सायरा बानो (60) आणि मोहम्मद नईम (55) यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

चालकाच्या हाताने यापूर्वी झाला अपघात

मृतांना आणि जखमींना जेजे हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले. पायधुनी पोलिस प्रकरणाचा तपास करत आहे. याप्रकरणीप पोलिसांनी चालक समीर दीघेला अटक केले आहे. पोलिसांनी सांगितले की, दिघेच्या हातून यापूर्वी एक अपघात झाला होता. त्यात कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.