आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा:ओबीसी आरक्षणासाठी उद्या राज्यभर आंदोलन करणार, एक हजार ठिकाणी निदर्शने- बावनकुळे

2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे सरकारवर हल्ला चढवला आहे. ओबीसींचे आरक्षण गेले. यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भूमिका संशयास्पद असल्याचं सांगून ओबीसी आरक्षणासाठी उद्या राज्यात जोरदार आंदोलन करण्यात येईल. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली.

तसेच एक हजार ठिकाणी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचेही चंद्रशेखर बावनकुळे सांगितले. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार असल्याने त्यांनी संतापही व्यक्त केला.

किमान सहा जिल्ह्याचा डाटा तयार केला असता तर तिथे आरक्षण देता आले असते. सहा महिन्यात राज्य सरकारने काय केले? हे सर्वोच्च न्यायालयाने विचारले. पण राज्य सरकारने काहीही केले नाही. ओबीसी आयोगाचा प्रस्ताव आल्यानंतर मुख्य सचिवाने एकही बैठक घेतली नाही. मुख्य सचिवांवर बैठक न घेण्याबाबत दबाव आहे, असा आरोपही बावनकुळे यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...