आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दुर्घटना:मुंबईत दोन इमारती कोसळून 7 ठार, 38 जणांना वाचवले; इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • याआधी मालाड परिसरातील दोन मजली चाळ कोसळली, यात एक व्यक्ती जखमी

 मुंबईत पावसाचा कहर सुरूच आहे. गुरुवारी मालाडच्या मालवणी व फोर्टमध्ये इमारत कोसळण्याच्या दोन घटनांत 7 जणांचा मृत्यू, तर 15 जण जखमी झाले. ढिगाऱ्यांखाली अनेक जण अडकल्याची भीती आहे.

दुर्घटनेनंतर अग्नीशमन दलाचे 50 कर्मचारी ढिगारा हटवण्याचे काम करत आहेत. घटना लकी हाउसजवळील भानुशाली बिल्डिंगमध्ये संध्याकाळी 4.43 वाजता घडली. 

घर मालकाला आधीच दिली होती नोटीस

अपघातानंतर बीएमसी आयुक्त इकबाल सिंह चहलदेखील घटनास्थळी दाखल झाले. फोर्ट रोडचा हा परिसर खूप गजबजलेला असतो. अशात अग्नीशमन दलाच्या गाड्यांना घटनास्थील पोहचण्यास खूप अवघड झाले होते.

घटनास्थळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडनेकर दाखल झाल्या. यावेळी त्या म्हणाल्या की,  'धोकादायक इमारतींकडे महापालिका दुर्लक्ष करत नाही. मात्र, आम्ही लोकांना खेचून घरातून बाहेर काढू शकत नाहीत. त्यामुळे मालकांची किंवा प्राधिकरणाची ती जबाबदारी असते. मला मिळालेल्या माहितीनुसार या इमारतीचा एक मालक आहे. त्याला महापालिकेकडून नोटीस देण्यात आली होती. पण इमारतीचा मालक आणि रहिवासी यांच्यात याविषयी चर्चा झालेली नसेल. मालकाने इमारतीचे काम करायला हवे होते. मात्र, मालकाने चालढकलपणा केला. आताच एक मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. त्यामुळे जे चालढकल करतात अशा मालकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा', असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

जितेंद्र आव्हाडांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले

मिळालेल्या माहितीनुसार, या इमारतीला धोकादायक असल्याचे सांगून घरमालकाला बीएमसीने नोटिस दिली होती. घटनास्थळी दाखल झालेले गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

पावसामुळे मालाडमधील चाळ  कोसळली

याआधी दुपारी मालाडमधील मालवणी भागातील एक इमारत कोसळल्याची घटना घडली. महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी 2.35 ला ही इमारत कोसळली. महापालिकेने आपल्या ट्विटर हँडलवरुन दिलेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाला दुपारी एक इमारत कोसळल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर तात्काळ पोलिसांसह अग्निशमन विभागाची एक रेस्क्यू व्हॅन , चार फायर इंजिन आणि एक अँब्यूलन्स घटनास्थील दाखल झाले आहेत. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 5-6 जण अडकल्याची माहिती होती, त्यापैकी चार जणांना वाचवण्यात यश आले आहे. या चौघांनाही रुग्णालयात पाठवण्यात आले असून, बचाव कार्य अद्याप सुरुच आहे.

7 वर्षात मुंबईत कोसळल्या 3,945 इमारत

आरटीआय कार्यकर्ता शकील शेख यांनी सांगितल्यानुसार,मागील सात वर्षात(2013-2019) मुंबईत 3945 इमारती कोसळल्या आहेत. यात 300 जणांचा मृत्यू तर 1146 जखमी झाले आहेत.