आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपघात:कचरा टाकण्यासाठी घराबाहेर आलेल्या महिलेला भरधाव ट्रकने उडवले, जागीच मृत्यू

पिंपळनेर10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामोडे येथील महिला घराचा  कचरा घरा बाहेर टाकण्यासाठी गेली असता  भरधाव ट्रालाने महिलेला उडवल्याची घटना घडली आहे.

 सामोडे येथील साक्री-पिंपळनेर रस्त्यावरील  सामोडे गावातील नूतन विद्यामंदिर शाळेच्या बाजुस राहणारी आशाबाई शरद वाघ (वय 2८) या साडेपाच ते पावणेसहा  वाजेच्या दरम्यान आपले घर झाडून झाल्यावर रस्त्यालगत असलेल्या उकिरड्यावर कचरा टाकण्यासाठी गेली असता पिंपळनेर कडुन सामोडे कडे भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॉली क्रमांक (आर जेे १९ जी एफ ६८२४) ने  या महिलेला जोरदार धडक दिल्याने तिचा डोक्याचा भागाचा पूर्ण चेंदामेंदा झाल्याने जागीच ठार झाल्या.

अपघातानंतर ट्रक चालकाने गाडीसह पळ काढल्याने त्यास काही तरुणांनी पाठलाग करुन धवळीविहीर गावाजवळ गाडीसह अडवले . यावेळी ड्रायव्हर दारूच्या नशेत होता असे काही तरुणांचे म्हणणे आहे. त्याच वेळी पोलिस दाखल झाल्याने सदर ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेऊन पिंपळनेर पोलीस स्टेशनला आणले. 

चालकाचे नाव परमेश भेरुलाल गुजर (वय२६) रा. दर्जी मोहल्ला,कुंडीया कला भिलवाडा राजस्थान असे आहे. मयत झालेल्या आशाबाई वाघचे पती आई यांच्यासह  नातेवाईकांनी  यांनी सदर आरोपी आमच्या समोर आणत नाही तोपर्यंत  रस्ता रोको  करू अशी ठाम भूमिका घेतल्याने रस्त्यावर दगड टाकुन महिलांसह नातेवाईक यांनी काहीवेळ रस्ता बंद केला होता. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

बातम्या आणखी आहेत...