आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:शिरसोदे येथील तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

पारोळा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील शिरसोदे येथील तरुण शेतकऱ्याने बुधवारी सकाळी घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. राकेश भास्करराव पाटील (२२) असे मृत तरुणाचे नाव आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.

राकेशच्या वडिलांचे निधन झाले आहे. अवघ्या पाच बिघे शेतजमिनीत तो कुटुंब चालवत होता. त्याने ३ लाखांचे खासगी सावकाराकडून कर्ज घेतले होते. त्याचे व्याज वाढत असल्याने त्याला नैराश्य आले होते. १७ रोजी त्याची आई छायाबाई या महालपूर गावी गेल्या होत्या. घरात एकटाच असताना गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिस पाटील बंडू पाटील यांनी ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास अभिजित पाटील करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...