आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खून:घराबाहेर बीट खाणाऱ्या तरुणाने केले चाकूचे वार, तीन महिलांनी केला वाचवण्याचा प्रयत्न; पुजाऱ्याचा मृत्यू

अंबाजोगाई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या शेपवाडी येथील हनुमान मंदिरातून गुढीपाडव्याच्या दिवशी (दि.२, शनिवार) पूजापाठ करून घरी परतणाऱ्या संतोष दासोपंत पाठक (५०, रा. रविवार पेठ, अंबाजोगाई) यांच्यावर तरुणाने चाकूचे सपासप वार केले. यात पुजारी संतोष यांचा मृत्यू झाला. मंदिराजवळ आरोपी तरुण पांडुरंग शेप (२५) चे घर असून घटनेपूर्वी तो घराबाहेर बसून चाकूने बीट कापून खात होता. पुजारी पाठक यांना पाहताच अचानक त्याने त्यांच्यावर चाकूने वार केले. दरम्यान, घटना घडत असताना तीन महिलांनी आरोपीवर दगडफेक करत पुजाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर गंभीर जखमी पुजाऱ्याला ग्रामस्थांनी स्वाराती रुग्णालयात दाखल केले. तपासणीनंतर डॉक्टरांनी पाठक यांना मृत घोषित केले. आरोपी शेप याच्याविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला अटक केली. पांडुरंग हा मनोरुग्ण असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

बातम्या आणखी आहेत...