आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:लग्नाचे अमिष दाखवून तरूणीवर अत्याचार, सैन्य दलातील एका जवानाविरोधात गुन्हा दाखल

हिंगोलीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून लॉजवर नेले, नंतर दारू पाजून केला अत्याचार

कळमनुरी तालुक्यातील कसबे धावंडा येथील एका तरुणीस लग्नाचे अमिष दाखवून तसेच दारू पाजवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या सैन्य दलातील एका जवानाविरुध्द आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. ९ दुपारी गुन्हा दाखल झाला आहे. सदरील जवान कसबे धावंडा येथील रहिवासी असून सध्या पंजाब राज्यात कर्तव्यावर आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कसबे धावंडा येथील गौतम प्रभाकर खिल्लारे हा मागील वर्षी गावी आला होता. त्यावेळी त्याने गावातील एका तरुणीला ता. १ ऑगस्ट २०१९ रोजी लग्नाचे अमिष दाखवून नांदेड येथे एका लॉजवर नेले. त्या ठिकाणी तिला दारू पाजवून तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर तिच्यासोबत लग्नाचे नाटक करून तिला नांदेड येथे खोली देखील करून दिली. ता १२ ऑगस्ट २०२० पर्यंत त्याने त्या तरुणीवर अत्याचार केले. त्यानंतर तिला गावाकडे पाठवून स्वतः कर्तव्यावर निघून गेला. त्यानंतर त्याच्याकडून फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्या तरुणीने आज आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी गौतम प्रभाकर खिल्लारे याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपाधिक्षक वसीम हाश्‍मी, सहाय्यक पोलिस निरीक्षक रवीकांत हुंडेकर पुढील तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...