आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई येथील समाजवादी पार्टीचे नेते आणि आमदार अबू आझमींनी महिलासंबंधी मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, महिलांच्या चेहरा न झाकण्यामुळे आणि लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यामुळे देशात वाईट गोष्टी वाढत आहेत. काही दिवसांपुर्वी पुण्यात आत्महत्या केलेल्या पुजा चव्हाण आणि एका कथित मंत्र्यांच्या संबंधात विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देतांना ते बोलत होते.
सोबत राहिल्यानंतर बलात्कारचे गुन्हे नोंदवत आहेत
अबु आझमी पुढे म्हणाले की, 'लिव्ह-इन रिलेशनशिप कायदा चूकीचा आहे. हे खूप घातक आहे. मुली आणि महिला लिव्ह-इन रिलेशनशिपच्या नावावर एक दोन वर्षे सोबत राहतात आणि नंतर पुरुषांविरोधात गंभीर आरोप लावत गुन्हा नोंदवतात.'
देशात पाश्चात्य संस्कृतीची हवा - अबू आझमी
आझमी पुढे म्हणाले की, 'महिलांच्या या खोट्या आरोपांमुळे एका व्यक्तीचे आयुष्य उद्धवस्त होते. यामुळे हा कायदा चुकीचा असून सध्या देशात पाश्चात्य संस्कृतीची हवा चालू आहे. ज्यामध्ये सर्वजण वाहत चालले असून हे ताबडतोब थांबवण्याची गरज आहे.
पुजा चव्हाण प्रकरणात ते बोलत होते
काही दिवसांपुर्वी पुण्यात आत्महत्या केलेल्या पुजा चव्हाण आणि एका कथित मंत्र्यांच्या संबंधात विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देतांना ते बोलत होते. पुजा ही मुळची बीडच्या परळीची असून ती काही दिवसांपूर्वी इंग्लिश स्पीकींगच्या क्लासेससाठी पुण्यात आली होती. ती आपल्या भावांसोबत पुण्याच्या वानवडी भागात वास्तवाला राहत होती.
रविवारी रात्री पुजाने पुण्यातील हेवन पार्क इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या केली होती. परंतू पोलिसांना तिच्या फ्लॅटमधून कोणत्याच प्रकारचे सुसाईड नोट मिळाले नाही. ज्यानंतर सोशल मीडियावर चर्चा चालू आहे की पुजाचे विदर्भातील एका मंत्र्यासोबत प्रेम संबंध होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.