आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:महिला बाइक रायडरचा माहूरला जाताना मृत्यू, टँकर खाली आल्याने डोक्याचा चेंदामेंदा; सातारा येथील हिरकणी बाइक रायडर ग्रुपची होती सदस्य

शरद काटकर | नांदेड2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा येथील हिरकणी ग्रुपच्या महिला बाईक राईड करत महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन घेण्यासाठी निघाल्या होत्या. मात्र या ग्रुपमधील शुभांगी संभाजी पवार यांचा अपघाती मृत्यू झाला आहे.

सातारा येथून माहूरला रेणूकामातेच्या दर्शनासाठी जात असलेल्या हिरकणी बाईक राईड ग्रुपच्या महिला रायडर्सचा भोकरफाटा (ता.अर्धापूर) येथे टँकरच्या चाकाखाली येवून अपघात झाला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. शुभांगी संभाजी पवार (३२) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता.१२) सकाळी १० च्या सुमारास घडली.

हिरकणी बाईक राईड ग्रुप
हिरकणी बाईक राईड ग्रुप

टँकर डोक्यावरुन गेल्याने मृत्यू
सातारा येथील हिरकणी ग्रुपच्या नऊ महिला सदस्या आज १० ऑक्टोबर रोजी एक हजार ८६८ किमी प्रवासासाठी मोटार सायकलने नवरात्रोत्सवात आदिशक्तीच्या साडेतीन आशक्तीपिठांचे दर्शन घेण्यासाठी मोटारसायकलवर निघाल्या होत्या. त्यांनी कोल्हापूरातील महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेऊन ते तुळजापूर पोहोचल्या. आई तुळजाभवानीचे दर्शन करून पुढील माहूरगडात रेणुकामातेच्या दर्शनासाठी जात असताना भोकरफाटा दाभड येथे शुभांगी पवार यांची मोटारसायकल क्रमांक (एम.एच.११ सी.ए.१४४७) स्लीप झाली. त्याच वेळी पाठिमागून आलेला टँकर क्रमांक (जि.जे.१२ ए. टी. ६९५७) च्या खाली वाहन येऊन पाठीमागील चाकाखाली चेंगरुन शुभांगी यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे डोक्यावर असलेले हेल्मेट शरिरापासून वेगळे होवून पडले होते.

डोक्यावर असलेले हेल्मेट शरिरापासून वेगळे होवून पडले होते.
डोक्यावर असलेले हेल्मेट शरिरापासून वेगळे होवून पडले होते.

टँकर ताब्यात

या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अशोक जाधव, पोलिस उपनिरीक्षक कपील अगलावे, पोलिस कर्मचारी महेंद्र डांगे, महामार्गचे रमाकांत शिंदे, गजानन डवरे, वसंत सिनगारे मृत्यूजय दूत गोविंद टेकाळे यांनी मदत केली आहे. हा टँकर अर्धापूर पोलीसांनी ताब्यात घेतला असून शुभांगी पवार यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी अर्धापूर (जि.नांदेड) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र दाखल केला होता.