आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक; लातूर परिसरात भूकंपाचे धक्के:भूकंपाचा केंद्रबिंदू किल्लारी असल्याची आपत्ती व्यवस्थापन कक्षाची माहिती

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
1993 मध्ये सप्टेंबर महिन्यात 30 तारखेला प्रलयंकारी भूकंप झाला होता. त्या वेळी आक्रोश करणाऱ्या ग्रामस्थांचा हा प्रतिकात्मक फोटो आहे.

एकेकाळी भयानक भूकंपाने महाराष्ट्रच नाही तर देशाला हादरवणाऱ्या लातूर जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के बसले आहे. विशेष म्हणजे या धक्क्याचे केंद्र हे देखील पुन्हा किल्लारी परिसर असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षातून देण्यात आली आहे. हा भूकंप सौम्य प्रमाणात 2.4 रिस्टर स्केल नोंदवण्यात आला असल्याचेही आपत्ती व्यवस्थापन कक्षाने सांगितले आहे. शनिवार 19 नोव्हेंबर 2022 रोजी दोन वाजून सात मिनिटांनी हे धक्के किल्लारी आणि परिसरात जाणवले. सुमारे पाच किलोमीटरचा परिसर या धक्क्यामुळे हादरला. या भूकंपामुळे किल्लारी मध्ये झालेल्या 1993 मध्ये भूकंपाच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत.

1993 मध्ये झाला होता भूकंप

लातूर जिल्ह्यातल्या किल्लारीत 1993 मध्ये सप्टेंबर महिन्यात 30 तारखेला प्रलयंकारी भूकंप झाला होता. सरकारी आकड्यांनुसार 7 हजार 928 जणांचा त्यात मृत्यू झाला. प्रत्यक्षात अनेकांचे मृतदेह मिळाले नाहीत. भूकंप झाल्यापासून दरवर्षी किल्लारी परिसरात 30 सप्टेंबर हा काळा दिवस म्हणून पाळण्यात येतो. सर्व व्यवहार बंद ठेवून भूकंपात बळी गेलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात येते. तहसीलदारांच्या हस्ते किल्लारीतील स्मारकावर अभिवादनाचा कार्यक्रम आयोजिला जातो. 1993 पासून आजपर्यंत हजारावर लहान-मोठे धक्के बसल्याचे ग्रामस्थ सांगतात; परंतु लातुरातील केंद्रात सर्व धक्क्यांची नोंद नाही. भूकंपाची नोंद घेण्यासाठी किल्लारीत भूकंपमापक यंत्र बसवण्यात आले होते; परंतु ते केव्हाच बंद असते. लातूरला एक केंद्र उभारण्यात आले आहे. मात्र, किल्लारी परिसरात एकूण किती वेळा किती तीव्रतेचे भूकंप झाले याची नोंदच नाही.

बातम्या आणखी आहेत...