आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:प्रेमप्रकरणातून नांदेडात घरात घुसून तरुणीचा खून, आरोपीला अटक

नांदेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेमप्रकरणातून एका तरुणीचा खून झाल्याची घटना नांदेड शहरातील शारदानगर येथील झेंडा चौक परिसरात रविवारी दुपारी १२.१५ च्या सुमारास घडली. या प्रकरणातील आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे. नांदेडच्या शारदानगरातील झेंडा चौक परिसरातील ॲड. हरडफकर यांच्या घरात भाडेतत्वावर राहणारी वैष्णवी संजयसिंह गौर (२१) व आरोपी सुरेश देविदास शेंडगे (२६ रा. पांगरी) या दोघांचे काही वर्षांपासून प्रेमप्रकरण होते. मात्र, काही दिवसांपासून दोघांमध्ये बिनसले आणि दोघेही एकमेकांपासून दुरावले होते.

याच कारणावरून आरोपी सुरेशने वैष्णवी घरात एकटीच असल्याची संधी साधून रविवारी दुपारी १२.१५ ते १२.३० दरम्यान धारदार खंजीरने गळा चिरून तिची हत्या केली. घटनास्थळी तिचा मृतदेह रक्ताच्या थारोळयात पडला होता. या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी विमानतळ पोलिसांना दिली. पोलिस पोहोचले तेव्हा आरोपी सुरेश पळून जाण्याच्या तयारीत होता. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...