आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुरस्कार:संजय आवटे, राजन खान, भाऊ कदम यांना आचार्य अत्रे पुरस्कार

गराडेएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
दिव्य मराठीचे राज्य संपादक संजय आवटे - Divya Marathi
दिव्य मराठीचे राज्य संपादक संजय आवटे

आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदर व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सासवड याचे वतीने दरवर्षी देण्यात येणारे साहित्य, पत्रकारिता व कलाकार पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. आचार्य अत्रे प्रतिष्ठान व साहित्य परिषद सासवड यांच्या निवड समितीने या नावाची शिफारस केली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते व साहित्य परिषद सासवड शाखेचे अध्यक्ष अँड. अण्णासाहेब खाडे यांनी पुरस्कराची घोषणा केली. 

देशातील सर्वात मोठ्या अशा "भास्कर "वृत्तपत्र समूहाच्या "दिव्य मराठी "चे मुख्य संपादक संजय श्रीधर आवटे यांना आचार्य अत्रे पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. संजय आवटे यांनी लोकसत्ता, सकाळ, लोकमत, कृषीवल, पुढारी इत्यादी दैनिकात महत्वाच्या पदावर काम केले आहे "साम वाहिनी चे संपादक असताना "आवाज महाराष्ट्राचा " हा कार्यक्रम अंत्यत लोकप्रिय झाला होता. पत्रकारिता क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण काम केले बद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. त्यामध्ये मुंबई मराठी मराठी पत्रकार संघ, सी. डी. देशमुख, यशवंत पाध्ये स्मृती पुरस्कार, बाळशास्त्री जांभेकर ग्रामरत्न दर्पण पुरस्कार इत्यादींचा समावेश आहे. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. 

आचार्य अत्रे पत्रकारिता पुरस्कार यापूर्वी किरण ठाकूर, कुमार केतकर, प्रकाश पोहरे, डॉ. दीपक टिळक, संजय राऊत, राजीव खांडेकर, प्रवीण बर्दापूकर, इ. ना. प्रदान केला आहे.

लेखक राजन खान
लेखक राजन खान

संजय आवटे यांच्यासोबतच मराठी साहित्यातील प्रसिद्ध लेखक राजन खान यांनाही आचार्य अत्रे साहित्य पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. राजन खान यांनी आता पर्यंत १६ कादंबऱ्या,१५ कथासंग्रह, ७ लेख संग्रह याचे लेखन केले आहे. मी मलाच  माहिती नाही, गूढ या कादंबऱ्या, "हिलाल ",बाईजा ,गिर्हाईक ,,बीज धारणा या सारखे कथासंग्रह व पिढी, आडवं तिडवंया सारखे लेख संग्रह प्रसिद्ध आहेत. 

आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार या पूर्वी प्रा राम शेवाळकर, माधव गडकरी, बाबासाहेब पुरंदरे, कवियत्री शांता शेळके, डॉ. अरुणा ढेरे, अशोक नायगावकर, डॉ आनंद यादव, प्रा अनिल अवचट, रंगनाथ पठारे, कवी अनिल कांबळे, इ. ना. प्रदान केले आहेत. 

अभिनेते भाऊ कदम
अभिनेते भाऊ कदम

या वर्षीचा आचार्य अत्रे कलाकार पुरस्कार "चला हवा येउद्या "या लोकप्रिय मालिकेतील विनोदी कलाकार भालचंद्र पांडुरंग कदम उर्फ भाऊ कदम याना जाहीर झाला आहे. भाऊ कदम यांनी १९९१ मध्ये अभिनयास सुरवात केली फू बाई फू "या मराठी मालिकेतून विनोदी कलाकार म्हणून त्यांना प्रसिद्धी मिळाली. भाऊ कदम यांनी ५०० पेक्षा जास्त नाट्यप्रयोग सादर केले आहेत  केले आहे. तसेच टाईमपास,जाऊ द्याना बाळासाहेब, झाला बोभाटा डोबिवली फास्ट इत्यादी मराठी चित्रपटात तसेच "फेरारी  कि सवारी "या हिंदी चित्रपटामध्ये काम केले आहे.

आचार्य अत्रे कलाकार पुरस्काराने या पूर्वी प्रभाकर पणशीकर, डॉ. रामचंद्र देखणे, राहुल सोलापूरकर, विजय कदम, प्रशांत दामले, मकरंद अनासपुरे, विजय चव्हाण, डॉ. निलेश साबळे, आनंद इंगळे याना सन्मानित करणेत आले आहे ,  

साहित्य परिषद शाखा सासवडचे अध्यक्ष अँड. अण्णासाहेब खाडे, जेष्ठ पत्रकार तानाजी कोलते, प्रतिष्ठानचे सचिव शांताराम पोमण यांचा निवड समितीत समावेश होता. दरवर्षी आचार्य अत्रे यांच्या स्मृतिदिनी १३ जून रोजी सासवड येथे पुरस्कार वितरण करण्यात येते या वर्षी कारोना साथी मुळे हा पुरस्कार वितरण सोहळा  नंतर होणार आहे अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते यांनी दिली.    

आचार्य अत्रे प्रतिष्ठानमध्ये झूम ऍपव्दारे मिटींग घेण्यात आली. या वेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते, साहित्य परिषदेचे अध्यक्ष अँड. अण्णासाहेब खाडे, कार्याध्यक्ष खाजाभाई बागवान, उपाध्यक्ष बंडूकाका जगताप, कार्यवाह डॉ. जगदीश शेवते, सतीश पाटील, कार्यकारिणी सदस्य वसंतराव ताकवले, अँड. दिलीप निरगुडे, प्रतिष्ठानचे सचिव शांताराम पोमण, सदस्य रवींद्र पोमण कुंडलिक मेमाणे, संतोष काकडे, बाळासाहेब मुळीक, हनुमंत चाचर, सचिव शिवाजी घोगरे, ज्येष्ठ पत्रकार तानाजी कोलते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...