आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हिरेनच्या मृत्यू प्रकरणी केंद्र आणि राज्यातील दोन मोठ्या तपास संस्था आमने-सामने आल्या आहेत. मंगळवारी NIA च्या स्पेशल कोर्टात केंद्रीय तपास संस्था (NIA) ने एक तक्रार दाखल केली आहे. यात म्हटले आहे की, गृह मंत्रालयाकडून 20 मार्चला मिळालेल्या आदेशाच्या तीन दिवसानंतरही महाराष्ट्र ATS प्रोसीजर फॉलो करत नाहीये आणि याप्रकरणी महत्वाच्या फाइल देत नाहीये. NIA च्या आरोपावर आज महाराष्ट्र ATS ला न्यायालयात आपले उत्तर द्यायचे आहे.
या प्रकरणी तीन संस्थांचा तपास सुरू
अँटिलियाबाहेर जिलेटिन असलेल्या गाडी प्रकरणाचा तीन तपास संस्थांकडून तपास सुरू आहे. यातील एक प्रकरण हिरेन यांच्या स्कॉर्पियो चोरीचे आहे, त्याला मुंबईतील गामदेवी पोलिस तपास करत आहेत. दुसरे प्रकरण अंबानी यांच्या घरापासून काही अंतरावर जिलेटीन असलेल्या स्कॉर्पिओचे आहे. याचा तपास केंद्र सरकारच्या आदेशावर NIA करत आहे. याच प्रकरणात API सचिन वाझेंना अरेस्ट केले आहे. तिसरे प्रकरण स्कॉर्पियोचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचे आहे. या प्रकरणाचा तपास गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आदेशावर महाराष्ट्र ATS करत आहे.
वाझेंच्या कस्टडीचा मुद्दा
अँटिलिया प्रकरणात सचिन वाझेंची NIA कस्टडी गुरुवारी संपत आहे. महाराष्ट्र ATS चे प्रमुख जयजीत सिंह यांनी मंगळवारी सांगितले की, मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणातील अनेक सीसीटीव्ही फुजेट नष्ट करण्यात आल्या आहेत. पण, त्यांच्या हाती अनेक गोष्टी लागल्याचेही त्यांनी सांगितले. पुढे त्यांनी सांगितले की, सहिन वाझेंनी त्यांच्यावरील आरोपांचे खंडन केले आहे. त्यांची कस्टडी 25 मार्चला संपत असून, यानंतर ते त्यांच्या कस्टडीचा प्रयत्न करणार आहेत.
दोन जणांना ATS ने घेतले ताब्यात
ATS ने हिरेन यांच्या हत्या प्रकरणात निलंबित पोलिस विनायक शिंदे आणि क्रिकेट सट्टेबाज नरेश गौडला ताब्यात घेतले आहे. NIA ने सांगितले की, या दोन जणांच्या अटकेनंतर सचिन वाझे मुख्य आरोपी असल्याचे एटीएसला समजले होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.