आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

नांदेड:मराठी अभिनेत्री मयुरी देशमुखच्या पतीने राहत्या घरात घेतला गळफास, कारण अस्पष्ट

नांदेड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

'खुलता कळी खुलेना' या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री मयुरी देशमुखचा पती आशुतोष भाकरे याने आत्महत्या केली आहे. आशुतोषने नांदेडमधील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, आत्महत्येमागचे आशुतोषचे नैराश्य असल्याची माहिती समोर येत आहे.

आशुतोषने ‘भाकर’, ‘इच्यार ठरला पक्का’ या चित्रपटात काम केलं आहे. तर मयुरीने डॉ. प्रकाश बाबा आमटे, 31 दिवस आणि ग्रे यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. परंतू, तिला खरी ओळख 'खुलता कळी खुलेना' या मालिकेतून मिळाली. आशुतोष आणि मयुरी देशमुख 21 जानेवारी 2016 रोजी लग्नबंधनात अडकले होते.​​​​​​​