आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजपने राममंदिराचे राजकारण बंद करावे, असा घणाघात सोमवारी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला. ते अयोध्या येथे बोलत होते. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे, वरुण सरदेसाई यांची उपस्थित होते. राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे येत्या 15 जूनला अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यापार्श्वभूमीवर येथील आढावा घेण्यासाठी शिवसेना नेते संजय राऊत आणि एकनाथ शिंदे अयोध्येला गेले आहेत.
वातावरण खराब करू नये
आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वी राऊत आणि शिंदे यांनी तयारीचा आढावा घेतला. यावेळी संजय राऊत म्हणाले की, मधल्या काळात काही जणांना अयोध्येतील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला, पण अयोध्येच्या जनतेच्या मनात शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रचंड श्रद्धा आहे.
जनतेचे ठाकरे कुटुंबावर प्रेम
पुढे राऊत म्हणाले की, अयोध्येच्या जनतेचे ठाकरे कुटुंबावर प्रेम आहे. आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी अयोध्या आणि आसपासची जनता प्रचंड उत्सुक आहे. 15 तारखेला लखनऊला आदित्य ठाकरे यांचे आगमन होईल तेथून ते अयोध्येला येऊन दर्शन घेतील. राम मंदिराचे काम सुरू आहे. त्याठिकाणी प्रत्यक्ष भेट देतील. शिवसेनेच्या वतीने शरयूच्या तिरावर एक नेत्रदीपक आरतीचा सोहळा देखील आयोजित करण्यात आला आहे, त्यात देखील आदित्य ठाकरे आपली हजेरी लावणार आहेत.
मंदिराचे राजकारण थांबवा
संजय राऊत म्हणाले की, हा एक श्रद्धेचा कार्यक्रम असून, यात राजकारण अजिबात नाही. मंदिराचे राजकारण आता संपवा. मंदिरात आता श्रद्धा आणि अध्यात्म याचाच वास असावा, असा सल्ला देखील राऊतांनी भाजपला दिला आहे.
राम मंदिराचे स्वागत
राऊत म्हणाले, राम मंदिर निर्माणचे स्वागत सर्वांनी केले पाहिजे. कारण ज्या जागेवर राम मंदिर उभारले जात आहे, त्या जागेसाठी जो लढा झाला, त्यासाठी या देशातील हजारो कारसेवकांनी भाग घेतला. आपले बलिदान दिले. महाराष्ट्रातून देखील हजारो शिवसैनिक, रामभक्त येथे आले आणि त्या जागेसाठी तुरुंगवास भोगला, संघर्ष केला. त्यामुळे या जागेसाठी आम्ही भावनिक दृष्ट्या जोडलो आहोत.
15 जूनला अयोध्या दौरा
15 जूनला आदित्य ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. त्याचा आढावा घेण्यासाठी शिवसेनेचे नेतेमंडळी अयोध्येत आहेत. आदित्य ठाकरे हे 10 जूनला अयोध्येला जाणार होते, मात्र 10 जूनला राज्यसभा निवडणूक असल्याचे हा दौरा 15 जूनला ठेवण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.