आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासत्ता संघर्षाबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर आता विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यावा लागणार आहे. मात्र, नियुक्त करताना भरत गोगावले यांची झालेली नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवली आहे. त्यामुळे आज ना उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह इतर आमदार हे अपात्र ठरवले जातील, असे मत ज्येष्ठ विधीज्ञ वकील सतीश तळेकर यांनी व्यक्त केले आहे. ते दिव्य मराठीशी बोलत होते.
पाहा.... नेमके काय म्हणाले सतीश तळेकर
'आयाराम-गायाराम प्रवृत्तीला आळा घालणारा आणि राज्यघटनेतील मूल्यांची बूज/ नीती राखणाऱ्या निकालाचे लोकशाही प्रेमी प्रत्येक नागरिक स्वागत करेल. सर्वांच्या वतीने न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी एकच निकाल दिल्याने सर्वोच्च नायालयाची प्रतिष्ठा व न्यायालयावर विश्वास वाढेल. सर्वानुमते एकच निकाल देण्याचे श्रेय सर्वस्वी डीवाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाला द्यावे लागेल.
राज्यपालांकडून सर्रास लोकशाही व राज्यघटनेची पायमल्ली होत असताना सर्वोच्च न्यायालयाने जबरदस्त चपराक दिल्याने राज्यपालांच्या तथाकथित अनिर्बंध अधिकारावर लगाम बसण्यास मदत होईल.
प्रतोत ( व्हीप) काढण्याचा अधिकार हा विधिमंडळातील पक्षनेत्याचा नसून तो पक्ष प्रमुखाचा असल्याचे ठामपणे सांगितल्याने आणि गोगावले यांची नियुक्ती रद्द केल्याने आज ना उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर 15 आमदारांना अपात्र ठरवून त्यांचे सदसत्व रद्द केले जाईल.
राज्यघटनेतील 10 व्या परिशिष्टातील तरतुदीचा अर्थ लोकशाही मुल्याधारित काढल्याने सर्वोच्च न्यायालय सर्व सामान्य जनतेच्या विश्वासाला अधिकच पात्र ठरते.'
'ऑपरेशन सक्सेसफुल, बट पेशंट डेड'
हा निकाल म्हणजे 'ऑपरेशन सक्सेसफुल, बट पेशंट डेड' असल्याचे मत विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांनी व्यक्त केले, ते 'दिव्य मराठी'शी बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार आता विधानसभा अध्यक्षांनाच 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घ्यावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व चुकले पण सरकार अधिकृत आहे, अशी ही परिस्थिती असल्याचे देखील ते म्हणाले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.