आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1 वर्षाने चंद्रकांत खैरेला भेटायला हिमालयात जावे लागेल:शहाजी बापू पाटलांनी उडवली खिल्ली, म्हणाले-'गुहा बुक करायला लागतेय'

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका वर्षाने चंद्रकांत खैरेला भेटायला हिमालयात जावे लागेल. असे म्हणत शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटलांनी शिवसेना चंद्रकांत खैरेंची खिल्ली उडवली आहे.

शिंदे गटातील पन्नासच्या पन्नास आमदार निवडणूकीत पडतील, असे वक्तव्य शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी काल केले होते. तसेच जर हे सर्व आमदार पडले नाही तर मी हिमालयात जाईन, असेही त्यांनी म्हटले होते. याचवेळी बीकेसी मैदानात होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून 52 कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत, असा दावाही चंद्रकांत खैरेंनी केला होता.

रिझर्व्हेशन कसे करावे?

चंद्रकांत खैरेंच्या हिमालयात जाईन या विधानावर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसून येत आहे. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनंतर आता सांगोल्याचे 'काय झाडी, डोंगर' फेम आमदार शहाजीबापू पाटलांनीही त्याच ठसक्यात खैरेंना सुनावले आहे. ते म्हणाले, कसे रिझर्व्हेशन करायचे हे काही मला अजून कळलेले नाही. दिल्लीत कुठेतरी जाऊन गुहा बुक करावी लागेल. यावेळी पत्रकारांना उद्देशून ते म्हणाले, 1 वर्षानंतर तुम्हाला चंद्रकांत खैरेंना भेटायला हिमालयात जावे लागेल.

सावंत, राऊंतासारखी लोक हादरली

शहाजी बापू पाटील पुढे बोलताना म्हणाले, अरविंद सावंत, विनायक राऊत, संजय राऊत यांच्या सारख्यांनी शिवसेनेचे वाटोळे केले. बाप चोरला हे वाक्य उद्धव ठाकरेंच्या तोंडी शोभते का? डॉ. बाबासाहेबांचे विचार घेऊन काम करणाऱ्या अनेक संघटना आहेत. त्याचप्रमाणे शिंदेंनी बाळासाहेबांचे विचार घेऊन नवा गट स्थापन केला तर त्यात काय चुक? वेगाने झालेल्या सत्तांतराने संपूर्ण जगाला धक्का बसला. याचमुळे सावंत, राऊंतासारखी लोक हादरली आहेत. एखादी चांगली शाळा असेल तर या सगळ्यांना पहिलीत घालावे लागेल.

गुलाबराव पाटलांचीही टीका

मंत्री गुलाबराव पाटील यांनी चंद्रकांत खैरेंच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. ते म्हणाले, चंद्रकांत खैरे स्वतः आधी निवडून आलेले नाही. एमआयएमने त्यांच्या स्वतःच्या बालेकिल्ल्यात त्यांना पाडून टाकले. त्याला म्हणाव, पहिल तु सुधर बाबा लोकांच काय पाहतो. असा टोलाही त्यांनी लगावला.

बातम्या आणखी आहेत...