आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑपरेशन कमळ:बिहारनंतर महाराष्ट्रातही ऑपरेशन कमळ होणार, भाजप नेते नारायण राणे यांचा दावा

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नुकतंच बिहार निवडणुकीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले. यासोबतच राज्यात पुन्हा एकदा एनडीएची सत्ता स्थापन होणार आहे. पण, यावेळेस जदयूपेक्षा भाजपला जास्त जागा मिळाल्या. यावरुनच आता महाराष्ट्रात ऑपरेशन कमळ नक्की होणार, असा दावा भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी केला आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाले. या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. बिहार निवडणुकीच्या विजयाचे संपूर्ण श्रेय मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना देतो. देशातील जनतेच्या सुरक्षिततेची काळजी घेतल्याने आणि त्यांच्या इतर समस्या सोडवल्यामुळे भाजपला बिहारमध्ये विजय मिळाला, अशी प्रतिक्रिया राणे यांनी व्यक्त केली. तसेच, महाराष्ट्रातही ऑपरेशन कमळ होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पण, तुर्तास याविषयी अधिक बोलण्यास त्यांनी नकार दिला.

बातम्या आणखी आहेत...