आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • After Crossing A Distance Of 150 Km, MLA Kailash Patil Made His Own Escape; Minister Eknath Shinde Was Trying To Take Him To Surat |marathi News

कशीबशी मुंबई गाठली:150 किलोमीटर अंतर पार करत आ.कैलास पाटलांनी केली स्वतःची सुटका; सुरतला नेण्याचा होता प्रयत्न

उस्मानाबाद4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार डॉ.तानाजी सावंत व आमदार ज्ञानराज चौगुले यांनाही सोबत नेले आहे. सुरुवातीला उस्मानाबाद-कळंबचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनाही वाहनात बसवण्यात आले. मात्र, बंडखोरीचा प्रकार लक्षात येताच समयसूचकता वापरून ते तावडीतून निसटले. गुजरात सीमेपासून म्हणजे मुंबईपासून सुमारे १५० किलोमीटर अंतरापासून त्यांनी कशीबशी मुंबई गाठली. त्यांनी कधी दुचाकी, कधी ट्रकमध्ये बसून दहिसरपर्यंत हा प्रवास केला.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उस्मानाबादचे आमदार तथा पक्षाचे जिल्हाप्रमुख कैलास पाटील हे तीन दिवसांपूर्वी रेल्वेने मुंबईला गेले होते. सोमवारी विधान परिषदेच्या मतदानानंतर त्यांना आपल्याला भेटण्यासाठी जायचं आहे, असे सांगत विधान भवनातून अन्य गाडीतून बाहेर नेण्यात आले. ते अन्य सहकारी आमदारांच्या सांगण्यावरून गाडीत बसले, मात्र गाडी मुंबईबाहेर पडल्यानंतर त्यांना काहीतरी गडबड होत असल्याची जाणीव झाली. त्यामुळे त्यांची अस्वस्थता सुरू झाली. गुजरातच्या सीमेवर पोहोचल्यानंतर अंधारात वाहनांच्या गर्दीत त्यांनी आपली गाडीतून सुटका करून घेतली. त्यांनी उलट्या दिशेने म्हणजेच मुंबईकडे धाव घेतली. काही अंतर चालून आल्यानंतर त्यांनी दुचाकी चालकाला विनंती करत काही किलोमीटर अंतर पार केले. त्यानंतर त्यांनी ट्रकला हात केले, त्यांना काही ट्रकमधून मुंबईचा मार्ग जवळ करता आला. त्यानंतर कसेबसे दहिसरपर्यंत आल्यावर त्यांनी पक्षातील अन्य सहकाऱ्यांना ही माहिती दिली आणि त्यांना नेण्यासाठी गाडी पाठवण्यात आली. आमदार पाटील यांच्यासोबत झालेल्या या प्रकाराला खा. संजय राऊत यांनीही पत्रकारांना दुजोरा दिला.

बातम्या आणखी आहेत...