आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • After Hearing Shahaji Bapu Patal's Speech Nilesh Rane Says | 'Bapu, Your Craze Is As Shah Rukh Khan In Maharashtra'

शहाजी बापू पाटलांचे खुमासदार भाषण ऐकून राणे म्हणतात:'मी तुम्हाला शपथ घेऊन सांगतो, शाहरुख खान एवढी तुमची क्रेझ'

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

'रफिकभाई, कुठंय तुम्ही. काय नेते कुठंय तुम्ही. आम्ही सध्या गुवाहाटीला आहोत. काय ती झाडी..डोंगर..'. डोंगराला आणि झाडाला बोलल्यावर पाटील जोमात आहे, नाहीतर आम्हाला कोण बोलवतय. डोंगर झाडी घेऊन आलो आहे. असे म्हणत शिंदे गटाचे बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील यांनी एकच धमाल उडवून दिली. यावेळी नीलेश राणेंनी 'बापू मी तुम्हाला शपथ घेऊन सांगतो शाहरुख खान एवढी तुमची क्रेझ महाराष्ट्रात तयार झाली आहे,' म्हणत बापूंचे कौतुक केले.

सांगलीच्या पलूस येथे आयोजित दहीहंडी कार्यक्रमात आमदार शहाजी बापू पाटील बोलत होते. यावेळी नीलेश राणे यांची देखील उपस्थिती होती. पुढे ते म्हणाले, इकडे राणे साहेब बसलेत दुसरीकडे देशमुख आहेत. आणि मानसी नाईक ताई म्हणतात पाटील जोमात आहे. डोंगर झाडी घेऊन आलो आहे, असे म्हणत असतांनाच त्यांनी काय झाडी, काय डोंगर हा डायलॉग देखील त्यांनी म्हणून दाखवला. यावेळी बापू म्हणाले सांगोल्यातल्या तरुणाईने दोनदा गणपतराव देशमुखांना पाडायच काम करुन दाखवलं.

बापू, कोकणात पण या

नीलेश राणेंनी यावेळी बापूंचे मोठ्या प्रमाणावर कौतुक केले. एकदा तुम्हाला कोकणातही यावं लागेल. कोकणात देखील झाडी, डोंगर आहेत. ती आम्ही दाखवू असे म्हणत त्यांना कोकणात येण्याचे निमंत्रण दिले. तसेच अडीच वर्षांनी हिंदू धर्माच्या सणासाठी शहाजी बापू सारख्या योद्ध्यांनी महाराष्ट्रमधून कोरोना घालवला असे म्हणत उद्धव ठाकरेंना टोला देखील लगावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आता सगळे सण साजरा करता येत असल्याचे उद्गार त्यांनी काढले.

बातम्या आणखी आहेत...