आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पुलगाव येथील सिएडी कॅम्पमधील दारुगोळा भांडारमध्ये कार्यरत असलेल्या सैनिकाने (दि. 2 जुलै) रोजी मध्यरात्री 1.30 वाजेच्या सुमारास शासकीय निवासस्थानात जाऊन रायफलने पत्नीसह स्वतःवर गोळी झाडली.यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर सैनिकाचा रुग्णालयात उपचारार्थ मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
माहितीनुसार जिल्ह्यातील पुलगाव सिएडी कॅम्प मध्ये कार्यरत असलेल्या अजय कुमार सिंग (वय 25) या सैनिकाची ड्युटी पिंपळगाव येथील दारु गोळा भांडार मध्ये होती. 2 जुलैच्या मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास तो परिसरातील शासकिय निवासस्थानात घरी पाणी पिण्यासाठी आला असता, त्याने पत्नी प्रियंका कुमारी (वय 26) जवळ असलेल्या रायफलने गोळी झाडत स्वतःवरही गोळी झाडली.यामध्ये पत्नीचा घटनास्थळी मृत्यू झाला होता.
सिएडी कॅम्प परिसरात गोळीबार झाल्याचा आवाज ऐकू आल्यानंतर परिसरात असलेल्या सैनिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी अवस्थेत असलेल्या अजय कुमार या सैनिकाला सावंगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता,उपचारार्थ सैनिकाचा मृत्यू झाला. अजय कुमार व प्रियंका या दोघांचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला असून,पत्नी गरोदर असल्याचे सांगितले जात आहे.सैनिकाने पत्नीवर व स्वतःवर गोळी का झाडली याचा अद्यापही कारण पुढे आले नसल्यामुळे पुलगाव पोलिस शोध घेत आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.