आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मुलाखत:शरद पवारांनंतर संजय राऊतांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मुलाखत, अनेक विषयांवर मुख्यमंत्र्यांनी मांडली भूमिका

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'चे कार्यकारी संपादक आणि शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली होती. ही मुलाखत चांगलीच गाजली होती. त्यानंतर आता संजय राऊतांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली आहे. संजय राऊत यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन या मुलाखतीबाबत माहिती दिली आहे.

संजय राऊत यांचे ट्वीट

संजय राऊत यांनी सांगितल्यानुसार, येत्या 25 आणि 26 जुलैला शिवसेनेचे मुखपत्र सामना आणि वृत्त वाहिन्यांवर मुलाखतीचे प्रक्षेपण होणार आहे. 27 जुलैला उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. त्याचेच औचित्य साधत संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली. मुलाखतीत राज्य सरकार, केंद्र सरकार, राम मंदिर, अशा अनेक विषयांवर उद्धव ठाकरेंनी मुलाखतीत आपली भूमिका त्यांची मांडली.