आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रायगड:दानवेंनंतर नारायण राणेंची जीभ घसरली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानाखाली लगावण्याची भाषा

रायगड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यानंतर मंत्री नारायण राणे यांचीही जीभ घसरली. राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांना कानाखाली लगावण्याची भाषा वापरली. राणे कोकणच्या दौऱ्यावर जनआशीर्वाद यात्रेसाठी आहेत. महाडमध्ये त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले.

राणे म्हणाले, मुख्यमंत्र्यांना कोण सल्ला देतो हे त्यांनाच कळत नाही. ते आम्हाला काय सल्ला देणार, ते काय डॉक्टर आहेत? तिसऱ्या लाटेचा त्यांना कुठून आवाज आला, अपशकुनासारखं बोलू नको म्हणावं. त्याला बोलायचा अधिकार तरी आहे का? बाजूला एखादा सेक्रेटरी ठेव आणि बोल म्हणावं. त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून? अरे हीरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती. देशाच्या स्वातंत्र्यदिनाची तुम्हाला माहिती नसावी, या शब्दांत राणेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

बातम्या आणखी आहेत...