आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • After The Galwan Violence, China Launched A Cyber Attack On Mumbai's Power Supply System, Says Newyork Times Report

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टमध्ये खुलासा:गलवान हिंसेनंतर चीनने मुंबईच्या पॉवर सप्लाय सिस्टीमवर केला होता सायबर हल्ला

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सीमेवरील हिंसेनंतर 10,000 सायबर अटॅकचा प्रयत्न

गलवान घाटीत भारतीय सैन्यासोबत झालेल्या हिंसक मारामारीनंतर चीनी हॅकर्सनी मागच्या वर्षी 12 ऑक्टोबरला मुंबईतील पॉवर सप्लाय सिस्टीमवर सायबर हल्ला केला होता. या घटनेनंतर शहरात 10-12 तास विज सप्लाय बंद होता. हा खुलासा अमेरिकेतील प्रसिद्ध वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सने आपल्या एका रिपोर्टमध्ये केला आहे. रिपोर्टनुसार, चीनमधील RedEcho ग्रुपने हा हल्ला घडवून आणला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, 12 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजता विज सप्लाय बंद झाला होता. दोन तासानंतर रेल्वे सर्व्हिस सुरू झाली होती, पण पूर्णपणे सप्लाय ठीक करण्यासाठी 10-12 तास लागले होते. या घटनेला दशकातील सर्वात खराब पॉवर फेल्यूअर म्हटले होते.

भारताला शांत करण्याचा कट

सायबर अटॅकद्वारे चीन, भारताला शांत करण्याचा संदेश देऊ इच्छित होता. रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, भारतीय आणि चीनी सैनिक बॉर्डरवर आमने-सामने होते, तेव्हा मालवेअरला त्या कंट्रोल सिस्टीममध्ये इंजेक्ट केले होते, जी संपूर्ण देशाती विजेवर नियंत्रण ठेवते.

एका मीडिया रिपोर्टनुसार, महाराष्ट्र सायबर सेलच्या सुरुवातीच्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला होता की, पॉवर फेल्यूअरमध्ये मालवेयर अटॅक असू शकतो. परंतु, डिस्ट्रीब्यूशन कंपनीने आउटेजचे कारण, ठाणे जिल्ह्यातील लोड डिस्पॅच सेंटरमध्ये ट्रिपिंग सांगितले होते.

सायबर स्पेस कंपनीने केली होती ट्रेसिंग

रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, सायबर स्पेस कंपनी रिकॉर्डेड फ्यूचरने घटनेची मालवेअर ट्रेसिंग केली होती. कंपनीचे CEO स्टुअर्ट सोलोमनच्या हवाल्याने म्हटले आहे की, इंडियन पॉवर जनरेशन आणि ट्रांसमिशन इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये 10 पेक्षा अधइक नोड्सद्वारे एंट्री करण्यासाठी अॅडवांस सायबर टेक्नॉलोजीचा उपयोग केला होता.

सीमेवरील हिंसेनंतर 10,000 सायबर अटॅकचा प्रयत्न

रिपोर्टनुसार, एका अधिकाऱ्याने सांगितले की, बहुतेक हल्ले आणि मालवेअरची कमांड आणि कंट्रोल सर्वर चीनमधील आहेत. सीमेवरील हिंसेनंतर आम्हाला दररोज 10,000 सायबर हल्याचा प्रयत्न आढळून आला. सध्या हे हल्ले कमी झाले आहेत, पण आम्ही सतर्क आहोत.

बातम्या आणखी आहेत...