आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णालयाला आग:घटनेची सखोल चौकशी आणि दोषींविरुद्ध कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी, देवेंद्र फडणवीसांची मागणी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला शनिवारी सकाळी अचानक भीषण आग लागली. या दुर्घटनेत आतापर्यंत 10 रुग्ण दगावले आहेत. तसेच इतर काही रुग्ण भाजून जखमी झाले आहेत. गंभीर रुग्णांना पुण्यात हलवण्यात आले आहे.

फडणवीसांकडून घटनेच्या चौकशी करण्याची मागणी
जिल्हा रूग्णालयात आयसीयू कक्षात लागलेल्या भीषण आगीची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला व्यथित करणारी आहे.या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या शोकसंवेदना आहेत. त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. जखमींना लवकर बरे वाटावे, अशी मी प्रार्थना करतो. या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषींविरुद्ध कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे, अशी मागणी फडणवीस यांनी ट्विट करुन दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...