आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णालयात अग्नितांडव:आगीत 11 जणांचा मृत्यू, या घटनेचा जाब विचारून सरकारला सोडणार नाही; चंद्रकांत पाटलांचा इशारा; म्हणाले- अनिल देशमुख दोषी म्हणूनच त्यांना जामीन नाही

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगरची घटना दुर्दैवी आहे. विरोधी पक्षाचा नेता म्हणून कोणीतरी ही घटना घडलवी असे मी म्हणणार नाही. बरे होण्यासाठी आलेल्या 11 रुग्णांचे दिवाळीत बळी गेले आहेत. विरोधी पक्ष म्हणून आम्ही हा विषय लावून धरणार आहोत, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.

तसेच भाजप हा विषय सोडणार नाही, नेमके काय झाले, कोणामुळे झाले हे आम्ही विचारु, असा इशारा देत त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहीजे, अशी मागणीही केली.

तसेच, घटना घडल्यानंतर दोन ते तीन दिवस त्याची खूप चर्चा होते. नंतर तो विषय कुठे गायब होतो कळतच नाही. भंडारा, नाशिक, मुंबईची घटना घडल्यानंतर चौकशी समिती नेमण्यात आली होती. त्या समितीचा निष्कर्ष काय निघाला. त्या निष्कर्षाच्या आधारे काही काम करणार आहेत का नाही? ते काम करण्याचा काही टाईमबॉम्ब रिपोर्ट मिळणार आहे का नाही? नगरच्या घटनेत सगळ्यांनी मदत कार्य केले पाहिजे. मात्र, या आगीच्या घटनेची जी चौकशी कराल, त्याचा अहवाल लोकांपर्यंत कळले पाहिजे. आग का आग होती? आणि कोणामुळे घडली आहे? जनतेला कळायला हवे, यानंतरच ते रुग्णालय सुरू करायला हवे, असे मत त्यांनी अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आग दुर्घटनेबाबत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

अनिल देशमुख दोषी, म्हणून त्यांना जामीन नाही

न्यायालय शाहरुख खानच्या मुलाला 24 दिवस जामीन देत नाही. तसेच अनिल देशमुखांना न्यायालयीन कोठडी मिळते; याचाच अर्थ हा आहे की या केसमध्ये काही तरी दम आहे. अनिल देशमुख दोषी आहेत म्हणून त्यांचा जामीन झाला नाही. सर्व चौकशी होऊन त्यांना शासन व्हायला हवं. तरच सर्वसामान्य माणसाचा न्यायव्यवस्थेवर विश्वास बसेल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...