आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ajit Pawar Announces 5% Increase In Value Added Tax On Liquor;Maharashtra Budget Live: Maha Budget 2021। Maha Budget Speech Live। Maharashtra Assembly Latest News And Updates

राज्यात दारुच्या किमती वाढणार:मद्यावरील मूल्यवर्धित करामध्ये 5% वाढ, अजित पवारांची घोषणा

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यात 1.12 लाख कोटींची औद्योगिक गुंतवणूक येणार

अर्थमंत्री अजित पवारांनी आज राज्याचा अर्थसंकल्प मांडला आहे. महाविकास आघाडी सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. यावेळी पवारांनी राज्यातील माता-भगिणी, युवती-विद्यार्थींना शुभेच्छा देऊन अर्थसंकल्प मांडण्यासाठी सुरुवात केली. दरम्यान, आज अजित पवारांनी राज्यातील मद्यावरील कर वाढवला असल्याची घोषणा केली आहे.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, कोरोना काळात राज्यात मोठी आर्थिक गुंतवणूक आली. विविध उद्योगांशी केलेल्या करारांच्या माध्यमातून राज्यात 1.12 लाख कोटींची औद्योगिक गुंतवणूक येणार असून, या माध्यमातून 3 लाख नवे रोजगार अपेक्षित आहेत. यावेळी पवारांनी पेट्रोल-डिझेलबाबत काहीच घोषणा केली नाही. मात्र, मद्यावरील कर वाढवला आहे. यात व्हॅटमध्ये 5% वाढ करण्यात आली आहे. या वाढीव करासह आता मद्यावरील व्हॅट 60 वरून 65% झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...