आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ajit Pawar Comment On Bhagat Sing Koshyari: 'Governors Should Take Decision Regarding The Appointment Of MLAs' Ajit Pawar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पवार संतापले:'राज्यपालांनी आता अंत पाहू नये; आमदारांच्या नियुक्त्यांबाबत लवकर निर्णय घ्यावा'- अजित पवार

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'कधी तरी वेळ काढून त्यांना भेटावंच लागेलट'

राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्त्या रखडल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपालांवर जोरदार टीका केली आहे. सर्व नियम आणि अटी पाहून राज्यापालांना 12 नावे दिले आहेत. त्यामुळे, राज्यपालांनी आता अंत पाहू नये, असा संताप पवारांनी व्यक्त केला.

माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना अजित पवार म्हणाले की, सर्व नियम आणि अटी पाळून राज्यपालांना 12 नावे दिली आहेत. कॅबिनेटमध्ये ठराव करुन आणि मुख्यमंत्र्यांच्या सहीचे पत्रंही राज्यापालांना देण्यात आले. आम्हाला पूर्ण बहुमत असून, सभागृहातही बहुमत सिद्ध झाले आहे. त्यामुळे या नावावर राज्यपालांनी निर्णय घ्यावा, राज्यपालांनी अंत पाहू नये', असे अजित पवार म्हणाले.

पवार पुढे म्हमाले की, 'राज्यपाल नियुक्त सदस्यासाठी ज्या गोष्टी करायला हव्यात त्या सर्व करण्यात केल्या. एवढं सगळं झालेलं असताना ज्यांची अंतिम सही व्हायला हवी तेच सही करत नाहीत. त्यामुळे कधी तरी वेळ काढून त्यांना भेटावं लागेल. सही का करत नाहीत हे विचारावंच लागेल. शेवटी अधिकार त्यांचा असला तरी काही काळवेळ मर्यादा आहे की नाही?' असा सवालही त्यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...