आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवारांनी विरोधकांना फटकारले:'कुणाला किती मुले होती, कुणाचे लग्न झाले, का नाही झाले; कुणी काय लपवाछपवी केली, हे सांगू का?'- अजित पवार

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • धनंजय मुंडेंवर विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांवर अजित पवारांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कार केलेल्या महिलेने आपले आरोप मागे घेतले आणि मुंडेना दिलासा मिळाला. परंतु, विरोधकांकडून मुंडेंवर जोरदार टीका केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना चांगलेच फटकारले.

प्रसार माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, 'धनंजय मुंडे यांनी त्या प्रकरणावर संपूर्ण स्पष्टीकरण दिले आहे. तरीदेखील विरोधक टीका करत आहेत. आधी विरोधकांनी मुंडेंवर आरोप केले. नंतर तोंडघशी पडल्यावर आता वेगळा आरोप केला आहे. टीका करणे हे विरोधकांचे कामच आहे. पण, टीका करण्याला मर्यादा असावी,' असे पवार म्हणाले. तसेच, 'मागच्या सरकारच्या काळात काळात कुणी काय लपवाछपवी केली सांगू का? कुणाला किती मुले होती. कुणाचे लग्न झाले होते, झाले नव्हते, हे सांगू का? अशा बऱ्याच गोष्टी मला माहीत आहे,' असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

बातम्या आणखी आहेत...