आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपमुख्यमंत्र्यांचा ऑटो चालक अवतार:अजित पवारांनी चालवली तीन चाकी ई-रिक्षा, राज्यभरात रिक्षा राईडची चर्चा

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी ऑटो चालवताना दिसले. बारामती येथील PIAGGIO कंपनीच्या ई-ऑटोच्या प्रक्षेपणाला ते पोहोचले होते. ऑटो लॉन्च केल्यानंतर पवारांनी ती चालवण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर ते ऑटोमध्ये बसले आणि कंपनीच्या रस्त्यांवर लांबपर्यंत चालवली. त्यांची शैली पाहून तिथे उपस्थित लोक सतत टाळ्या वाजवत राहिले. अजित पवार यांना ऑटो चालवत पाहून कंपनीचे कर्मचारीही आश्चर्यचकित झाले.

पवार यांनी तेथे उपस्थित अधिकाऱ्यांकडून ऑटोची वैशिष्ट्ये समजून घेतली. या दरम्यान त्यांनी कंपनीचे कौतुक केले आणि सांगितले की अशी इलेक्ट्रिक वाहने पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी सोयीस्कर आणि महत्त्वपूर्ण आहेत.

सोशल मीडियावर अजित पवारांचे कौतुक
अजित पवार यांचा त्यांच्या क्षेत्रात खूप प्रभाव आहे. 1995 पासून ते सातत्याने बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकत आहेत यावरून याचा अंदाज लावला जाऊ शकतो. हेच कारण आहे की त्यांचे ऑटो ड्रायव्हरचे रुपही लोकांना खूप आवडत आहे. सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर करून पवारांचे खूप कौतुक केले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...