आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना:अजित पवारांना कोरोनाची लागण झाली नाही, पार्थ पवार यांच्याकडून वृत्ताचे खंडन

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्या काही माध्यमांनी प्रसिद्ध केल्या होत्या. पण, आता अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी या सर्व बातम्यांचे खंडन केले आहे. अजित पवारांना कोरोनाची लागण झाली नाही, त्यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आल्याचेही पार्थ पवार यांनी स्पष्ट केले. तसेच, अजित पवारांना थकवा जाणवत असल्यामुळे होम क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतल्याचेही पार्थ यांनी सांगितले.

अजित पवार यांना थोडी ताप आल्याने आणि थकवा जाणवत असल्याने त्यांनी क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांची तातडीने कोरोनाची चाचणीही करण्यात आली आहे. मात्र, कोरोनाचा रिपोर्ट हा निगेटिव्ह आला आहे. पण, खबरदारी म्हणून त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमात न जाण्याचे ठरवले आहे. तसेच आजच्या नियोजित बैठकाही रद्द केल्या आहेत. कालही त्यांनी मंत्रालयातील सर्व बैठका रद्द केल्या होत्या. अशी माहिती उपमुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.

व्हिसीद्वारे बैठकीला हजर राहणार

असे असले तरी अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. संध्याकाळी शरद पवार यांच्यासोबत वाय बी चव्हाण सेंटरमध्ये ही बैठक होणार आहे. या बैठकांना अजित पवार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित राहणार असल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

राष्ट्रवादी कार्यालयातील जनता दरबारही रद्द

अजित पवार बुधवारी मंत्रालयात सुद्धा अनुपस्थितीत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना पॅकेज देण्यावर होणारी मंत्रिमंडळाची कालची आणि आजची बैठक रद्द झाली आहे. आता शुक्रवारी ही बैठक होणार आहे. तर आजचा राष्ट्रवादी कार्यालयातील जनता दरबार ही पवारांनी रद्द केला आहे.