आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेता अक्षय कुमारने एका युट्यूबरवर 500 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. राशिद सिद्दीकी नावाच्या युट्यूबरने आपल्या चॅनेलवर सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूसंबंधी फेक न्यूज पोस्ट केली होती. तसेच, अक्षय कुमारवर रिया चक्रवर्तीला कॅनडाला पळून जाण्यास मदत केल्याचे आरोप लावले होते. यासोबतच त्याने दावा केला होता की, सुशांत प्रकरणी अक्षय कुमार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अदित्य ठाकरे यांच्या संपर्कात आहेत.
अक्षयवर सुशांतमुळे नाराज असल्याचा आरोप
मिड डेच्या रिपोर्टनुसार, सिद्दीकीने दावा केला होता की, अक्षय कुमार सुशांत सिंह राजपूतला ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपट मिळाल्यापासून नाराज होता. या रिपोर्टमध्ये हा दावाही केला आहे की, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूसंबंधी कंटेंट आपल्या चॅनेलवर पोस्ट करुन युट्यूबरने चार महीन्यात 15 लाख रुपयांची कमाई केली. 25 वर्षीय राशिद बिहारचा रहिवासी असून, तो युट्यूबवर FF न्यूज नावाचे चॅनेल चालवतो.
मुंबई पोलिस, महाराष्ट्र सरकार, मंत्री आदित्य ठाकरे आणि अभिनेता अक्षय कुमार विरोधात सिद्दीकीच्या खोट्या बातम्यांना YouTubers वर लाखो व्हिव्ह मिळाले आहेत. तसेच, तपासात समोर आले की, YouTube वर सुशांतच्या मृत्यू संबंधी बातम्या टाकून सिद्दीकीने 6.5 लाख रुपयांचा कमाई केली.
सुशांतच्या मृत्यूनंतर वाढले 1.7 लाख सबस्क्रायबर
यापूर्वी मुंबई सायबर पोलिसांनी दिल्लीचे वकील विभोर आनंदला अटक केले होते. आनंदवर सुशांतच्या मृत्यू संबंधी फेक न्यूज पोस्ट करणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंबाबत अपशब्द वापरण्याचा आरोप आहे. आनंदनेही या व्हिडिओतून हजारो सबस्क्रायबर मिळवले होते. सिद्दीकीकडे सुशांतच्या मृत्यूपूर्वी दोन लाख सबस्क्राइब होते, नंतर ते वाढून 3.70 लाख झाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.