आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी इम्पॅक्ट:नवापूर सीमावर्ती भागात दारू तस्करीला उत; राज्य उत्पादन शुल्कच्या नाकावर टिचून कारवाई 

नवापूर3 वर्षांपूर्वीलेखक: प्रवीण पवार
  • कॉपी लिंक
  • लाॅकडाऊन मध्ये गुजरात राज्यात देशी संत्रा मागणी

निलेश पाटील
कोरोना संदर्भात देशात लाॅकडाऊन आहे यादरम्यान गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणात देशी संत्र्याची मागणी असल्याने नवापूर तालुक्यातून दारू तस्करी केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. नवापूर परिसरात दारू तस्करी हा नवा विषय नसून अनेक महिन्यांपासून बंद असलेले दारू तस्करी सुरू कशी झाली हा महत्त्वाचा विषय चर्चिला जात आहे. नीतिमूल्यांना बाजूला करण्याचे काम केले जात नाहीये ना ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

नवापूर तालुक्यातील झामणझर गावातून गुजरात राज्यात छुप्या मार्गाने दारूची तस्करी सुरू झाली आहे. गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई केली आहे.गुजरात राज्यात दोन गाड्या, एक टेम्पो अवैध जॅकपाॅट बडीशेप देशी दारूचे 360 देशी संत्रा दारूचे बाॅक्स भरून जात असताना झामणझर गावात तिन्ही वाहनातील दारू जप्त करून कारवाई केली. नवापूर पोलीस ठाण्यात आणली आहे.महाराष्ट्र राज्यातून दारू खरेदी करून गुजरात राज्यात येथे अवैधरीत्या दारू विक्री केली जात आहे. लाॅकडाऊन दरम्यान गुजरात राज्यात दारू वाढती मागणी वाढल्याने दारू तस्करीला उत आला आहे.दिव्य मराठीने छोटी कारवाई पेक्षा मोठी करावी अशी बातमी दोन दिवसापूर्वी देताच नंदुरबार जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपविभागीय अधिकारी रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक किशोर नवले , महेंद्र नगराळे, शांतिलाल पाटील, दादाभाई वाघ, जितेंद्र तोरवणे यांच्या टिमने मोठी कारवाई केली आहे.

यात 28 लाखांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे. दारू तस्करी संदर्भात स्थानिक पोलीस ठाण्यातील अधिकार्‍यांना भनक सुद्धा राहत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले आहे. तर दुसरीकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकाऱ्यांना दारू प्रतिबंध करण्यासाठी स्वतंत्र विभाग असताना एवढा हलगर्जीपणा का हा एक संशोधनाचा विषय ठरला आहे.

प्रत्यक्षादर्शीकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी रात्रीच्या तीन वाजेच्या सुमारास गुजरात राज्यात दारू तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीसांना मिळाली. पोलीसांनी सापडा रचून कारवाई केली. दोन गाडी एक टेम्पो भरून दारू तस्करी करणार्‍या पकडले.असा एकुण 28 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अनिल मनोहर जवंजाळ वय 42, शेफाली पार्क, अशोक लोटन मराठे वय 50 रा.दयाल नगर सी.बी गार्डन नंदुरबार यांना ताब्यात घेतले आहे.आरोपी मुन्ना गामित रा व्यारा दोन चालक फारार असून नंदुरबार जिल्हा पोलीस शोध घेत आहेत.

दारू तस्करीकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष
नवापूर तालुक्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचा-यांना अवैध दारू वाहतूक,तस्करी, विक्री करणारे दारू माफियावर लक्ष नसल्याचे दिसून येत नवापूर तालुका महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागात असल्याने गुजरात राज्यात दारू बंदी असल्याने नवापूर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी होते. याकडे वरिष्ठांना लक्ष देणे गरजेचे आहे.


राज्य उत्पादन शुल्कच्या नाकावर टिचून कारवा
ई 
नवापूर तालुक्यातून करोडो रुपयांची दारू तस्करी गुजरात राज्यात होते.नंदुरबार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिका-याचा नाकावर टिचून कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात दारू तस्करी चालत असताना नेमका राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी करता तरी काय असा सवाल या कारवाई दरम्यान उपस्थित केला जात आहे.

लाॅकडाऊन चे उल्लंघन 
संपुर्ण भारतासह महाराष्ट्रात कोरोना विषाणुचा प्रार्दुभाव पसरु नये म्हणुन 14. एप्रिल रोजी पर्यंत लॉक डाऊन करण्यात आली असतांना, शासनाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केले असुन कोविड-19 कोरोना विषाणुमुळे होणारा साथीचा रोग पसरु नये व स्वतास लागन होवुन त्याच्यामुळे त्यांचे कुटुंबियास व समाजास लागन होवुन साथीचा रोगाचा प्रसार होण्यास प्रतिबंध होईल अशा पद्धतीने सोशल डिस्टर्सिंग न ठेवता व कोणतेही खबरदारी न घेता तसेच माक्स न वापरता वाहनांचा वापर करुन जिवितास धोका असलेला कोवीड- 19 संसर्ग पसरविण्याचा संभव आहे.

बातम्या आणखी आहेत...