आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेत्यांच्या प्रतिक्रिया:'राजीव सातव तु हे काय केलेस ? राष्ट्रीय राजकारणात तुझ्याकडून खुप अपेक्षा होत्या..'- संजय राऊत

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक- शरद पवार

काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे आज कोरोनामुळे अवघ्या 47 व्या वर्षी निधन झाले. मागील 23 दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू आहे. आज अखेर त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.

तुझं असं जाणं भयंकर वेदनादायक- संजय राऊत
संजय राऊत म्हणाले की, 'राजीव सातव तु हे काय केलेस? राष्ट्रीय राजकारणात तुझ्याकडून खुप अपेक्षा होत्या..तुझं हे असं जाणं भयंकर वेदनादायक आहे..चार दिवसापूर्वीच विडिओ काॅलवर आपण निशब्द हाय हॅलो केले..लवकरच बाहेर येण्याची तुझी विजयी मुद्रा माझ्या डोळ्यासमोर आहे..तुला श्रध्दांजली कोणत्या शब्दात वाहू?', असे ट्विट राऊत यांनी केले.

राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक- शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ट्विटरवरुन राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले की, 'काँग्रेस नेते आणि काँग्रेस कार्यकारी समितीचे निमंत्रक राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. महाराष्ट्रातील तरुण, तडफदार आणि अभ्यासू नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. गुजरातमधील निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने सोपवलेली प्रभारीपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत पक्षाला चांगले यश मिळवून देण्याची भूमिका त्यांनी पार पाडली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाला आहे', असे त्यांनी म्हटले.

आज आमच्यासाठी काळा दिवस-नाना पटोले
काँग्रेस नेते, नाना पटोले यांनी राजीव सातव यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. ते म्हणाले, आज माझ्यासाठी, तमाम कॉंग्रेसच्या कार्यकर्ता साठी काळाचा दिवस. माझा मित्र, माझा भाऊ राजीव सातव आज आमच्यात नाही. काय बोलाव काय लिहाव काही कळत नाही, ही हाणी कधीही न भरून निघणारी आहे. अलविदा मेरे दोस्त ! असे ते म्हणाले.

देशाने होतकरू नेता गमावला- पृथ्वीराज चव्हाण

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, देशाने तरुण, होतकरु नेता गमावला. युवा नेत्याचा परिवार गोळा करुन काँग्रेसची ताकद उभारण्याचा ते प्रयत्न करत असल्याचं म्हणत राजीव सातव यांच्या कार्याला दाद दिली. संघटनेच्या कामात त्यांनी स्वत:ला वाहून घेतले होते, अशा शब्दांत चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

बातम्या आणखी आहेत...