आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Rajya Sabha Election 7 Candidate In Maharashtra | All Seven Candidates For Rajya Sabha Are In The Fray; Voting For 6 Seats In Maharashtra After 24 Years

लढत अटळ:राज्यसभेसाठी सर्व 7 उमेदवार मैदानात; 24 वर्षांनी महाराष्ट्रात 6 जागांसाठी मतदान, महाडिक-पवार यांच्यात सामना

महाराष्ट्रएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यसभा निवडणुकीत अर्ज मागे घेण्याचा शुक्रवार शेवटचा दिवस होता. सत्ताधारी महाविकास आघाडीने बिनविरोध निवडीसाठी प्रयत्न केले. प्रस्ताव, चर्चा, बैठका झाल्या. दुपारी तीन वाजेपर्यंत पर्याय निघाला नाही. त्यामुळे मतदान अटळ हे स्पष्ट झाल्याने सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. संभाव्य घोडेबाजार आता अटळ असल्याचे दिसू लागल्याने सत्ताधारी आघाडीकडून आमदारांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे नियोजन सुरू आहे.

राज्यसभेतील दर दोन वर्षांनी २/३ सदस्य निवृत्त होतात. त्यामुळे राज्यसभेसाठी दर दोन वर्षांनी निवडणूक होते. गेली २४ वर्षे या निवडणुका महाराष्ट्रात बिनविरोध झाल्या आहेत. दोन दशकांची राज्याची बिनविरोधाची परंपरा शिवसेना व भाजप या युतीच्या जुन्या मित्रपक्षांच्या हाडवैरामुळे यंदा मोडीत निघाली आहे. काँग्रेसचे सुनिल केदार, राष्ट्रवादीचे छगन भुजबळ आणि आणि शिवसेनेचे अनिल देसाई शुक्रवारी सकाळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी गेले. भाजपने तिसरा उमेदवार मागे घ्यावा, त्याबदल्यात २० जून रोजी होत असलेल्या विधान परिषद निवडणुकीत एक अधिकची जागा सोडण्यात येईल, असा प्रस्ताव शिष्टमंडळाने दिल्याचे छगन भुजबळ यांनी सांगतिले.

बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील होते. ‘शिष्टमंडळासोबत तासभर चर्चा झाली. शिवसेनेने राज्यसभेसाठीची दुसरी उमेदवारी मागे घ्यावी, त्याबदल्यात भाजप विधान परिषदेची पाचवी जागा लढवणार नाही, असा आम्ही आघाडीच्या शिष्टमंडळाला प्रतिप्रस्ताव दिला. त्यानंतर माहाविकास आघाडीकडून कुठलाच संवाद झाला नाही, असे पाटील यांनी सांगितले.

भाजप लागला तयारीला
शिष्टमंडळाच्या भेटीनंतर भाजप नेत्यांची सागर येथे बैठक पार पडली. त्या बैठकीला राहुल नार्वेकर, प्रसाद लाड, प्रविण दरेकर, चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते. आपल्या तिसऱ्या उमेदवाराचा अर्ज मागे न घेता निवडणूक लढवण्याचे या बैठकीत निश्चित झाले.

महाडिक, पवार की प्रतापगढींना धक्का
एकुण, राज्यसभेसाठी मतदान अटळ आहे. भाजपचे धनंजय महाडीक की शिवसेनेचे संजय पवार यापैकी कोण चित होणार की काँग्रेसचे इमरान प्रतापगढी यांना अनपेक्षित धक्का बसतो, हे १० जून रोजी स्पष्ट होणार आहे.

तिसरी उमेदवारी मागे घेण्याचा आघाडीचा प्रस्ताव भाजपने फेटाळला
...अन् कोण उमेदवार माघार घेतो याची उत्सुकता संपली

दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज कोण मागे घेतो आहे ही उत्सुकता होती. माध्यमकर्मींनी विधिमंडळाबाहेर गर्दी केली होती. सातही उमेदवारांचे अर्ज कायम राहिले. चित्र स्पष्ट झाल्यावर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत म्हणाले, आता जी काही निवडणुकीची प्रक्रिया आहे त्याला सामोरे जाणे महत्त्वाचे आहे. महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून आणणे आमची जबाबदारी आहे.

आमदार संपर्कात असल्याचा महाडिक यांचा दावा : आघाडीच्या सदस्यांमध्ये नाराजी आहे. अपक्ष व छोट्या पक्षांचे आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. आम्हाला १०/ ११ मतांची गरज आहे. उर्वरित मते मिळतील. घोडेबाजार होणार नाही, असा दावा भाजपचे तिसरे उमेदवार धनंजय महाडिक यांनी केला.

खुले मतदार...अपक्षांचे काय?
आमदारांनी मतदान केल्यावर मतपत्रिका पक्षाच्या अधिकृत प्रतिनिधींना दाखवायची असते. मात्र अपक्षांना हा नियम बंधनकारक आहे की नाही याविषयी विधिमंडळाचे अधिकारी संभ्रमात आहे. याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे सल्ला मागितला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

-जागा ६ : उमेदवार ७, मतदार २८७, मतदान १० जून, मतमोजणी १० जून, पहिल्या पसंतीच्या ४२ मतांची गरज. -उमेदवार : भाजप : पीयूष गोयल, अनिल बोंडे, धनंजय महाडिक. काँग्रेस : इम्रान प्रतापगढी, राष्ट्रवादी : प्रफुल्ल पटेल, शिवसेना : संजय राऊत, संजय पवार.

बातम्या आणखी आहेत...