आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापरभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणाचे यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच सर्व 10 गेट उघडण्यात आले आहेत. पूर्णा नदीपात्रात विसर्ग करण्यात येत आहे. येलदरी धरण 100 टक्के भरल्याने परभणी आणि हिंगोली जिल्ह्याची पाण्याची चिंता मिटली आहे. तर जिल्ह्यातील धरण आणि प्रकल्प यांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असून त्यांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
परभणी आणि हिंगोली जिल्ह्याची तहान भगवणारे येलदरी धरण 100 टक्के भरले आहे. शिवाय धरणाच्या उर्ध्वबाजूस असलेल्या खडकपूर्णा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे येलदरी धरणाचे सर्व 10 गेट 0.5 मीटरने उचलण्यात आले आहेत. त्यातून 21 हजार 98.65 क्यूसेकने आणि वीज निर्मितीसाठी 2 हजार 700 क्यूसेक असा एकूण 23 हजार 798.65 क्यूसेकने पूर्णा नदी पात्रात विसर्ग करण्यात येत आहे.
मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात येलदरी धरणाच्या सर्व 10 गेट मधून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. तर यंदाच्या वर्षी 21 सप्टेंबर रोजी सायंकाळपासून सर्व 10 गेटमधून पहिल्यांदाच विसर्ग करण्यात येत आहे. येलदरी धरणात सध्या एकूण 934.44 दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. यात 809.77 दलघमी जिवंत पाणीसाठा आणि 124.67 दलघमी मृतसाठा आहे. मागील 24 तासात धरणात 40.710 दलघमी पाण्याची आवक झाली आहे. तर पुढील काळात धरणात होणारी पाण्याची आवक पाहून धरणातून होणारा विसर्ग कमी अथवा जास्त करण्यात येऊ शकतो असे प्रशासनाच्या वतीने संगण्यात आले असून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
शिवाय जिल्ह्यातील सेलू येथील निम्न दुधना प्रकल्प ही 100 टक्के भरला आहे. दरम्यान बुधवारी दुपारी या प्रकल्पाचे 8 गेट 0.60 मीटरने उघडण्यात आले असून नदी पत्रात मधून 17 हजार 328 क्यूसेकने विसर्ग करण्यात येत आहे. तर गोदावरी नदी पात्रावरील ढलेगाव, तारुगव्हान, मुदगल या तिन्ही बंधाऱ्यातून सुद्धा गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाने गोदावरी, दुधना, पूर्णा या नद्या काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.