आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी:लसीकरण केंद्र वाढवून लहान रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी द्या- राजेश टोपे

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्य सरकारने केंद्राकडे 367 केंद्रांची मागणी केली आहे

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लसीकरण वाढवण्यासाठी केंद्र वाढवण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. याशिवाय, केंद्राने महाराष्ट्राला दर आठवड्याला 20 लाख डोस द्यावे, अशीही मागणी त्यांनी केंद्राकडे केली आहे.

याबाबत बोलताना राजेश टोपे म्हणाले की, राज्य सरकारने केंद्र सरकारकडे 367 लसीकरण केंद्रांची मागणी केली आहे. यातील 209 केंद्रांची परवानगी देण्यात आली असू, उर्वरीत केंद्रांनाही परवानगी देणे गरजेचे आहे. शिवाय, सरकारने लसीकरण केंद्रासाठी 100 बेडच्या रुग्णालयाची जी जाचक अट घातली आहे, ती रद्द करावी आणि 50 बेड किंवा 25 बेडची क्षमता असलेल्या रुग्णालयांनाही परवानगी द्यावी, अशी मागणी केल्याचेही टोपेंनी सांगितले.

केंद्राने महाराष्ट्राला 2.20 कोटी डोस पुरवावेत : आरोग्यमंत्री टोपे

राज्यात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेसाठी केंद्र सरकारने कोरोना लसीचे 2.20 कोटी डोस पुरवावेत, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात टोपे यांनी नमूद केले आहे की, आठवड्याला २० लाख डोस पुरवावेत. राज्यात 45 वर्षांवरील आजारी लोक आणि 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना डोस देण्यासाठी येत्या साडेतीन महिन्यांत 2.20 कोटी डोसची गरज पडेल.

बातम्या आणखी आहेत...