आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा१ जानेवारी, १ मे अन् आता १५ ऑगस्ट... हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाचा मुहूर्त पुन्हा एकदा टळला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वातंत्र्यदिनी समृद्धी महामार्गाचे उद्घाटन करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. मात्र, स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या व्यग्रतेमुळे त्यांची तारीख मिळू न शकल्याने “समृद्धी’चे उद्घाटन पुन्हा एकदा लांबणीवर पडले आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० जून २०१५ रोजी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाची घोषणा केली. सध्या फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत तर हा प्रकल्प ज्यांच्या मंत्रालयाअंर्तगत सुरू झाला ते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार आल्यावर समृद्धीचे उद्घाटन हा प्राधान्याचा विषय बनला. सत्तापरिवर्तनानंतर “समृद्धी’च्या उद्घाटनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींना राज्यात आणण्याची शिंदे-फडणवीस यांची आकांक्षा आहे. यामुळे मुख्यमंत्री शिंदेंनी १५ ऑगस्टला उद््घाटन होईल, अशी घोषणा केली होती. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यामुळे पंतप्रधानांची वेळ न मिळाल्याने हे उद्घाटन आता स्वातंत्र्यदिनानंतरच्या काळात होईल.
वृक्ष व वन्यजीवांसाठी १ हजार कोटींची गरज
प्रकल्पात १.३६ लाख झाडे तोडली, बदल्यात ११.३१ लाख झाडे लावणे व जगवण्याची अट पर्यावरण मंत्रालयाच्या परवानगी पत्रात आहे. या झाडांची लागवड व ५ वर्षांपर्यंतच्या देखभालीसाठी ६९४ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे अभयारण्यांमधून जाणाऱ्या या रस्त्यात वन्यजीवांचे संरक्षण व्हावे म्हणून ८४ हजार ३२६ कोटींची बांधकामे प्रस्तावित आहेत.
अहमदनगर : दौंड रेल्वेमार्गावरील कान्हेगाव वारीदरम्यान ब्रिजचे काम ५०% झाले असून सेंट्रिंग सुरू आहे.
बुलडाणा : खडकपूर्णा नदीवरील पुलाचे काम बाकी आहे. लहान ओढ्यांवरील पूल बाकी आहेत.
शिर्डी : गोदावरी नदीवरील पुलाचे फक्त एका बाजूचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या बाजूचे काम ८० टक्के झाले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.