आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुर्चीवरच सोडला जीव:पत्नीच्या सरपंचपदासाठी घेतलेल्या प्रचार सभेत 'जय महाराष्ट्र' म्हणत पतीने घेतला अखेरचा श्वास

लातूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर जिल्ह्यातील मुरुडमध्ये एक धक्कादायक घटनासमोर आली आहे. सरपंचपदासाठी उभे असलेल्या पत्नीच्या प्रचारसभेत भाषण संपवून खूर्चीवर बसताच पतीने आपला प्राण सोडला. त्यामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

लातूर जिल्ह्यातील मुरुडमध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक सुरू आहे. निवडणुकीचा प्रचाराची रंगत आलेली असताना प्रचारसभेत भाषण झाल्यानंतर अमर नाडे हे खुर्चीवर बसले. यावेळी त्यांना छातीत दुखत असल्याचे त्यांनी स्टेजवरच पत्नीच्या कानात सांगितले. मात्र, काही कळायच्या आत त्यांची प्राणज्योत मालावली.

अमर नाडे यांच्या पत्नी अमृता नाडे या मुरुडच्या सरपंचपदासाठी निवडणूक लढवत आहेत. काल सायंकाळी त्यांच्या प्रचाराच्या वेळी अमर नाडे यांच्या छातीत कळ निघाली, यावेळी स्टेजवर एकच गोंधळ झाला यानंतर उपस्थितापैंकी काही जणांनी नाडे यांना रुग्णालयात दाखल केले, यावेळी डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

लातूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या मुुरुड ग्रामपंचायतीमध्ये नाडे काका-पुतण्याची गेल्या काही वर्षांपासून सत्ता आहे. मात्र, यंदा अमर नाडे यांनी काका दिलीप नाडे यांच्या विरोधात पॅनल उभे करत निवडणुकीत पॅनल उतरवले होते. यावेळी काकांच्या विरोधात प्रचार करत असताना त्यांनी दिलीप नाडेंवर जोरदार हल्लाबोल केला. जवळपास 25 मिनिटे भाषण केल्यानंतर त्यांनी जय महाराष्ट्र म्हणत आपले भाषण संपवले. मात्र, अमर नाडे यांचा हा जय महाराष्ट्र त्यांच्या जीवनातील अखेरचा ठरला.

भाषण संपवून खूर्चीवर बसताच अमर नाडे यांच्या छातीत कळ आल्याचे त्यांनी पत्नीस सांगितले, पत्नी त्यांना आधार देण्याचा प्रयत्न करेपर्यंत ते ग्लानी आल्याप्रमाणे खुर्चीवरुन सरकले. त्यानंतर स्टेजवर एकच धावपळ झाली. अमर हे खुर्चीवरुन खाली सरकले आणि त्यांनी मान टाकल्यानंतर काही जण त्यांच्या मदतीसाठी पुढे आले. ​​​​​​मात्र, त्यांना रुग्णालयात नेण्याआधीच त्यांचा प्राणज्योत मालावली होती. ​

बातम्या आणखी आहेत...