आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार नवनीत राणांना धमकीचा फोन:हनुमान चालिसा म्हटल्यास जीवे मारू; दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. हनुमान चालिसा पठण केल्यावर तुम्हाला जीवे मारण्यात येईल, तुम्हाला महाराष्ट्रात घुसून देणार नाही. पुन्हा हनुमान चालिसा वाचली, तर तुमची हत्या करण्यात येईल. अशी धमकी एका अज्ञात व्यक्तीने फोनवरुन नवनीत राणा यांना दिली आहे. याप्रकरणी त्यांनी दिल्लीतील नॉर्थ अव्हेन्यू पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

नवनीत राणा गेल्या काही दिवसांपासून हनुमान चालिसा पठणावरुन चांगल्याच चर्चेत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री बाहेर हनुमान चालिसा पठणाच्या उद्देशाने आलेल्या राणा दाम्पत्याला मुंबई पोलिसांनी राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली होती. त्यानंतर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर नवनीत राणांना मानदुखीचा त्रास जाणवत असल्याने त्यांना मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर राणा दाम्पत्य दिल्लीला ओम बिर्ला यांच्या भेटीसाठी गेले होते. तेव्हापासून ते दिल्लीच आहेत. त्याठिकाणीही त्यांनी हनुमान चालिसा वाचली होती. त्यांनंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात राणा दाम्पत्याची चर्चा रंगली. दरम्यान, नवनीत राणा यांना आता हनुमान चालिसा वाचण्यावरुन एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, नवनीत राणा यांना एका खासगी फोनवर एका अज्ञान व्यक्तीने 11 वेळा कॉल करुन जीवे मारण्याची धमकी दिली आहे. संबंधित व्यक्तीने राणा यांना शिवीगाळ करुन धमक्या दिल्या असून, तुम्ही पुन्हा हनुमान चालिसा वाचली तर तुमची हत्या केली जाईल. तुम्हाला महाराष्ट्रात घुसून देणार नाही. तुम्ही पुन्हा हनुमान चालिसा वाचली तर तुम्हाला जीवे मारण्यात येईल, अशी धमकी एका अज्ञात व्यक्तीने नवनीत राणा यांना दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...