आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबादास दानवेंचा विरोधकांवर पलटवार:मेमनचे उदात्तीकरण नको, मात्र माफी मागा म्हणणे हा नादानपणा

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

याकूब मेमनचे उदात्तीकरण व्हायला नको, हे दुर्दैवी आहे. काळाशी, सत्तेशी याची सांगड न घालता ज्या गोष्टी चूक आहे. त्यांचा निषेध व्हायलाच हवा. कोणी माफी मागावी वगैरे हा सगळा नादानपणा आहे. अशाप्रकारचा पलटवार विधानसभेचे विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी केला आहे.

पुढे दानवे म्हणाले, याकूब मेमनच्या कबरीवर सोन्याचा मुलामा दिला जातोय. ही गोष्ट निषेधार्ह आहे. घटना कोणाच्या काळात झाली, कोणी माफी मागावी हा एकूणच नादानपणा आहे. काळाचा विचार केला तर भाजपच्या काळात कित्येक अतिरेक्यांना सोडण्यात आले. काही अतिरेक्यांना पाकिस्तान-अफगाणिस्तानात सोडण्यात आले होते. काश्मिरमध्ये कित्येक अतिरेकी सोडले. काळाशी, सत्तेशी याची सांगड घालू नका, असे आवाहन त्यांनी केले आहे.

दानवेंचे ट्विट

याबाबत ट्विट करत अंबादास दानवेंनी या प्रकरणाचा निषेध केला आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणाले, मुंबई आणि मुंबईकरांना धुळीस मिळवण्याचे मनसुबे रचणाऱ्या याकूब मेमनच्या कबरीचे उदात्तीकरण करण्याचे काम सुरू असल्याचे वृत्त पाहिले. हे काम त्वरित थांबवून या कामाची चौकशी सरकारने करावी. हे धाडस कोणाकडून झाले हे पण समोर यायला हवे.

बावनकुळेंचा ठाकरेवर आरोप

मविआ सरकार चालवण्यासाठी आणि मुख्यमंत्रीपद टिकवण्याकरीता ​​​​​​बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांशी तडजोड करत मेमनच्या कबरीच्या सुशोभिकरणास उद्धव ठाकरेंनी अलिखित संमती दिली. यासाठी उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, या शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मविआ सरकार आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका केली. याकुब कबरीच्या सुशोभीकरणासाठी मविआ सरकराने मदत केल्याचा आरोपही बावनकुळे यांनी केला.

काय आहे प्रकरण?

मुंबईतील साखळी बॉम्ब स्फोटातील दोषी याकुब मेमन याला फाशी देण्यात आली होती. याच याकुब मेमनचा मृतदेह दक्षिण मुंबईतील बडा कब्रस्तानमध्ये दफन करण्यात आला होता. याकूब मेमन याच्या कबरीचे सुशोभीकरण करण्यात आल्याचे समोर आले. यावरून भाजपा आक्रमक झाली असून भाजप नेत्यांनी महाविकास आघाडीला लक्ष्य केले आहे. तर दुसरीकडे, मुंबई पोलिसांनी लगेच हालचाल करत या कबरीवरील एलईडी लाईट्स काढून टाकल्या.

बातम्या आणखी आहेत...