आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

वर्धा:बहिणीला पळून नेल्याचा रागात रुग्णवाहिका पेटवली, वर्ध्यातील धक्कादायक घटना

वर्धा21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून आरोपींनी रुग्णांना रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला पेटवल्याची घटना वर्ध्यात घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कुंदन रुपचंद कोकाटे (वय २२) वर्ष (रा जुनी वस्ती सेवाग्राम) हा तन्मय मेश्राम यांच्या मालकीच्या (एम एच ३३ जी ०६२६) या क्रमांकाच्या रुग्णवाहिकेवर चालक होता. त्याला रात्री १२:३९ वाजेच्या दरम्यान शास्त्री चौक या परिसरामधून रुग्ण घेऊन जाण्यासाठी फोन आला. तो रुग्णवाहिका घेऊन जात असताना जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर त्याला फोन आला आल्यामुळे त्याने वाहन थांबविले. यावेळी आरोपी संघर्ष लोखंडे व त्याचे दोन सहकारी मित्र रुग्णवाहिकेमध्ये चढले आणि चाकूचा धाक दाखवीत तुझ्या मालकाने माझ्या बहिणीला पळवले असल्याचे सांगत दोघांचा पत्ता विचारण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपींनी चाकूने वार केले आणि एवढ्यावरच न थांबता त्या तिघांनी रुग्णवाहिका पेटवून दिली.

याप्रकरणी वाहन चालकाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध कलम ३९४,३४ भादवी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्ह्यातील आरोपी संघर्ष सुनील लोखंडे व बादल सुनील लुथडे यांना ताब्यात घेतले आहे.