आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंधुदुर्ग:उद्घाटनाला डेअरिंगबाज माणूस हवा होता, म्हणूनच अमित शहांना बोलावले- नारायण राणे

सिंधुदुर्गएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'विकास कामांना विरोध आणि उद्घाटनाला आयत्या बिळावर नागोबा म्हणजे शिवसेना'

'विकास कामांना विरोध आणि उद्धाटनाला आयत्या बिळावर नागोब म्हणजे शिवसेना', असा घणाघात भाजप नेते नारायण राणे यांनी शिवसेनेवर केला. राणेंच्या सिंधुदुर्गातील 'लाईफटाईम' या वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना राणे बोलत होते.

यावेळी बोलताना नारायण राणे म्हणाले की, 'या महाविद्यालयाचा दगड ठेवला तेव्हापासून शिवसेनेकडून याला खूप विरोध केला. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या ठिकाणी नवे रुग्णालय उभारणार आणि त्यासाठी 900 कोटी रुपये देण्याचीही घोषणा केली. मात्र, तिजोरीत एक पैसा नाही आणि चालले 900 कोटी रुपये द्यायला. कोकणात विमानतळ होणार होते तेव्हाही विरोध करत आंदोलन करणारी शिवसेनाच होती. विकास कामांना विरोध करायचा आणि उद्धाटनांना आयत्या बिळावर नागोबासारखे येऊन बसायचे, यालाच शिवसेना म्हणतात,' असा घणाघात राणेंनी केला.

'डेअरिंगवाला माणूसच उद्घाटनाला हवा'

राणे पुढे म्हणाले की, 'अनेक विरोध आणि वाद झाले तरी वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले. अमित शाह यांना उद्घाटनाला बोलावण्यामागे आमच्या काही भावना होत्या. आम्ही जंगलात, सिंधुदुर्ग जिल्ह्यात 650 बेड्सचे हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज तयार केले. आमच्या काही डॉक्टरांना विचारले की, उद्घाटन कोणाच्या हस्ते करायचे? तेव्हा ते म्हणाले, तुम्ही ज्याप्रकारे मेडिकल कॉलेज सुरु करण्याचे धाडस केले. त्यामुळे उद्घाटनाला डेअरिंगवाला माणूस हवा, अशी मागणी सर्वांची होती. म्हणूनच मी दिल्लीत जाऊन अमित शहा यांना विनंती केली आणि त्यांनी माझ्या विनंतीला मान दिला. ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे, मी गेल्या अनेक वर्षात राज्यभरात भरपूर काम केलंय, असंही राणे म्हणालेत

बातम्या आणखी आहेत...