आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बींचा करोडपती बॉडीगार्ड:अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेत तैनात असलेल्या हेड कॉन्स्टेबलची झाली बदली; कोटींच्या घरात कमाईच्या चर्चेवर कारवाई, चौकशी होणार

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई पोलीस हेड कॉन्स्टेबल जितेंद्र शिंदे, जे अनेक वर्षांपासून अमिताभ बच्चन यांचे बॉडीगार्ड होते, त्यांची पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी बदली केली आहे. अमिताभ बच्चन जितेंद्रला वार्षिक 1.5 कोटी रुपये देत होते असा आरोप आहे. ही माहिती मिळाल्यानंतर जितेंद्रच्या विरोधात विभागीय चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.

जितेंद्र शिंदे 2015 पासून अमिताभ यांच्यासाठी काम करत होते. ते स्वतःची खासगी सुरक्षा एजन्सी देखील चालवत होते, अशी चर्चा आहे. विभागातील काही लोकांना याची माहिती मिळाली आणि हे प्रकरण मुंबई पोलीस आयुक्तांपर्यंत पोहोचले.

4 वर्षांपेक्षा जास्त काळ एका पोलीस ठाण्यात राहू शकत नाही -
मुंबई पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी कोणत्याही व्यक्तीला पोलीस ठाण्यात चार वर्षांपेक्षा जास्त काळ पद धारण करता येणार नाही असे फर्मान काढले होते. विभागाचे म्हणणे आहे की, या नियमांतर्गत शिंदे यांची डीबी मार्ग पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली. अमिताभ बच्चन यांच्या लेखा विभागाकडूनही देयक भरण्याबाबत माहिती मागितली जाऊ शकते.

जितेंद्र दरमहा 12 लाख रुपये घेत असे -
शिंदे नेहमी अमिताभ बच्चन यांच्यासोबत सावलीसारखे दिसत होते. काही काळापूर्वी अचानक त्यांच्या पगाराबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आणि असे म्हटले गेले की शिंदे यांचा पगार कोणत्याही मोठ्या MNC आणि CEO यांच्यापेक्षा जास्त आहे. चर्चा सुरु झाली की शिंदे अमिताभकडून दरमहा सुमारे 12 लाख रुपये घेत असत, याशिवाय त्यांना सरकारी पगारही मिळत असे.

मात्र, एवढे पैसे घेण्यामागचे कारण असे होते की त्यांनी बच्चन कुटुंबाला आपली वैयक्तिक सुरक्षाही दिली. सुप्रसिद्ध अमेरिकन अभिनेता आणि निर्माता एलिजा वुड यांना भारतात आल्यावर शिंदे यांनी सुरक्षा पुरवली होती.

बातम्या आणखी आहेत...