आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन वर्षात 'शिंदे-फडणवीस' सरकार कोसळणार:महाविकास आघाडीतील दोन नेत्यांकडून भविष्यवाणी

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाविकास आघाडीतील दोन नेत्यांकडून नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असल्याचे वक्तव्य करण्यात आले आहे. अमोल मिटकरी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच राज्यात सत्तांतर होणार असल्याची भविष्यवाणी करण्यात आली तर सामनातून राज्यातील बेकायदा सरकार लवकरच पडणार असल्याचे म्हटले आहे.

अमोल मिटकरी यांनी दावा केलाय की, अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच राज्यात सत्तांतर होणार आहे. पुढे बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, राज्यात मग्रुर सरकार आहे. त्यांना महापुरुषांच्या अस्मितेशी काही देणेघेणे नाही. राज्यापालांना पाठीशी घातले आहे.

जेव्हा आम्ही अवमानविरोधी विधेयक मांडा असे सांगितले तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विषय बदलला. राज्यपालांची त्यांनी पाठराखण केली. 27 फेब्रुवारीपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. त्याच्याआधीच हे सरकार कोसळणार.

संभाजी महाराज स्वराज्य रक्षकच

अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावर पाठिंबा देताना अमोल मिटकरी म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षकच होते. जे अजित पवारांवर टीका करताय त्यांना एवढी बुद्धी कधीपासून आली. आजकाल धर्मवीर कोणालाही म्हटले जाते मात्र स्वराज्य रक्षक ही प्रतिमा जागतिक महत्त्व दर्शवणारी आहे.

या चर्चा करा

पुढे बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, धर्मवीर उपाधी देऊन भाजप खुजेपणा दाखवत आहे. ज्यांना कुणाला त्यावर आक्षेप असेल त्यांनी खुली चर्चा करावी, जो हारेल त्याने राजीनामा द्यावा.

बेकायदा सरकार घरी गेलेले दिसेल

शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी देखील सरकार कोसळणार असल्याचे भाकीत शिवसेनेचे मुखपत्र सामनातून केले आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार पाडले हा राजकीय बळजोरीचा प्रकार होता. मावळत्या वर्षात महाराष्ट्राने एक बेकायदेशीर सत्तांतर पाहिले. लोकशाही व भारतीय घटनेचा कोणताही विधिनिषेध न बाळगता राजकारण करणारे देशाला अराजकाकडे ढकलत आहेत. 16 आमदारांना अपात्र ठरविण्याबाबतचा खटला आता सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे व सर्व काही कायद्यानेच झाले तर आमदारांसह मुख्यमंत्री शिंदे अपात्र ठरतील व नव्या वर्षात राज्यातील बेकायदा सरकार घरी गेलेले दिसेल.

बातम्या आणखी आहेत...