आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुजा चव्हाण प्रकरण:...तर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच 'या' प्रकरणी गुन्हा दाखल केला असता- अमोल मिटकरी

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चित्रा वाघ यांच्या आरोपांना राष्ट्रवादीचे सडेतोर उत्तर

भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केल्यामुळे चित्रा वाघ चांगल्याच आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या. चित्रा वाघ यांनी सरकारवर आरोप केले की, पुजा चव्हाण प्रकरण लावून धरल्यामुळे पतीवर गुन्हा दाखल केला, यानंतर आता राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विटरद्वारे चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर दिले आहे.

याबाबत अमोल मिटकरी म्हणाले की, 'किशोर वाघ यांच्यावर यापूर्वी म्हणजेच 12 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल झालेला आहे. भाजपनेच 2016 मध्ये याबाबत खुली चौकशी सुरू केली होती. आपण भाजपमध्ये गेला नसता, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच या प्रकरणी गुन्हा दाखल केला असता. आपण पवार साहेबांच्या तालमीत तयार झाल्या आहात, त्यामुळे दिशाभूल करू नये', असे मिटकरी म्हणाले. यासोबतच मिटकरी यांनी एसीबीने दाखल केलेल्या गुन्ह्याची एफआरआयची कॉपीसुद्धा ट्विटरवर पोस्ट केली आहे.

काय म्हणाल्या चित्रा वाघ ?

माध्यमांशी संवाध साधताना चित्रा वाघ म्हणाल्या की, केवळ चित्रा वाघचा नवरा म्हणून माझ्या नवऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. लाच घेताना माझा नवरा त्या ठिकाणी नव्हता. ज्यांनी लाच घेतली त्यांची अजुनही चौकशीच सुरू आहे. मात्र माझ्या नवऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. केवळ पूजा चव्हाण प्रकरण मी लावून धरले आहे यामुळेच आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत, असा आरोप त्यांनी केला. पण मी शांत बसणार नाही. मी बोलतच राहणार असेही चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...